पहिल्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढव्यातील भाग्योदयनगर भागात सुरू असणार्‍या बहुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एका मजूराचा मृत्यू झाला. पोलिसांनी ठेकेदारांना अटक केली आहे. पंधरा दिवसांपुर्वी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी शहबाज हुसेन शेख (वय 29, रा. कोंढवा खुर्द), शाकीर फिरोज अन्सारी (वय 33) अशी अटक केलेल्या ठेकेदारांची नावे आहेत. तर, साहेल एहमद सिद्धीकी (वय 35) असे मृत्यू झालेल्या मजूराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील भाग्योदयनगर परिसरात सर्व्हे.नं. 5514-7 येथे एका बहुमजली नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथील कामाचा ठेका दोघा आरोपींना देण्यात आला होता. दरम्यान, पहिल्या मजल्यावरील कामकाज सुरू होते. त्यावेळी साहेल याचा तोल गेल्याने तो पहिल्यामजल्यावरून खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा यात मृत्यू झाला.

आरोपींनी बांधकाम करत असताना मंजूराच्या जिवीताची काळजी न घेता त्यांना योग्य ती साधने न पुरवता हलगर्जीपणा केल्याने त्यांच्या गुन्हा दाखलकरून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.