Pune Yerawada Crime | संतापजनक! घरासमोर कपडे काढून महिलेचा विनयभंग, येरवडा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerawada Crime | अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव (Obscene Gestures) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची संतापजनक घटना येरवडा परिसरात घडली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.1) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास यशवंत नगर, येरवडा (Yashwant Nagar Yerawada) येथे घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Yerawada Crime)

याबाबत एका महिलेने मंगळवारी (दि.2) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन धनराज महेश थोरात Dhanraj Mahesh Thorat (वय-26 रा. यशवंत नगर, येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांची नणंद घराच्या दारात गप्पा मारत होत्या. आरोपी धनराज थोरात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महिलेच्या घरासमोर आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्याने स्वत:च्या अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले. आरोपीने यापूर्वी देखील महिलेचा पाठलाग करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

महिलेकडे पाहून अश्लील वर्तन

वारजे : महिलेचा पाठलाग करुन तिच्याकडे पाहून अश्लील वर्तन केल्याचा प्रकार वारजे माळवाडी परिसरात घडला आहे.
हा प्रकार मंगळवारी (दि.2) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे.
यावरुन एका 20 ते 22 वर्षीय अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने