Pune Yerwada Building Collapse | पुण्याच्या येरवड्यात स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर व कंत्राटदारावर गुन्हा दाखल; CP अमिताभ गुप्ता यांनी दिली माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerwada Building Collapse | येरवडा येथील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यु झाला असून या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी सांगितले. (Pune Yerwada Building Collapse)

 

येरवडा येथील शास्त्रीनगर (Shastri Nagar, Yerwada) येथील वाडिया बंगल्याजवळ (Wadia Bunglow Pune) एका इमारतीचे स्लॅबचे काम सुरु असताना लोखंडी सांगडा खाली कोसळून त्यात 6 जणांचा मृत्यु झाला तर 4 कामगार जखमी झाले. या दुर्घटनेच्या ठिकाणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज सकाळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, हा प्रकार कसा घडला याची चौकशी करण्यात येत आहे. हलगर्जीपणा केलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ब्लू ग्रास बिझनेस पार्क (Bluegrass Business Park) कंपनीसह, एमपीसीएल (MPCL Industries Ltd), अहलुवालिया कन्स्ट्रक्टर प्रा.लि. (Ahluwalia Contracts Pvt Ltd.) यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा सह इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Yerwada Building Collapse)

दिल्लीतील एका कंपनीमार्फत या ठिकाणी आय टी पार्कची (IT Park, Pune) उभारणी करण्यात येत आहे.
त्यासाठी पाया तयार करण्याचे काम सुरु होते.
पाया तयार करण्यासाठी लोखंडी जाळीचा सांगाडा तयार करण्यात आला होता.
त्याच्याखाली जाऊन कामगार काम करीत होते. मात्र, जाळीचे वजन सहन न झाल्याने तो संपूर्ण सांगाडा खाली कोसळला.
त्यात 10 कामगार अडकले होते. त्यातील 6 जणांचा मृत्यु झाला.

 

Web Title :- Pune Yerwada Building Collapse | Pune Police registers FIR against Bluegrass Business Park MPCL Industries Ltd and Ahluwalia Contracts Pvt Ltd and detains three people in connection the death of 6 labourers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा