रेजमेंट हवालदाराचा युनिफार्म फाडला; एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगाखान पॅलेस परिसरातील ड्रंक्रिन लाईनमध्ये विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारास अडविल्याचा रागातून रेजमेंट पोलिस हवालदाराचा युनिफॉर्म फाडल्याची घटना घडली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील आगाखान पॅलेस परिसरात घडली.

हनुमंत भास्कर गुट्टे (वय २३, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गौरव सिंग (वय ३३, रा. ड्रंक्रिट लाईन, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव सिंग कमांड कंम्पोझीट सिग्नल रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत आहेत. काल ते ड्रंक्रीट लाईन पसिरात ड्युटीवर होते. त्यावेळी हनुमंत विनाहेल्मेट दुचाकीवरुन चालले असल्याने गौरव सिंग यांनी त्याला अडविले. त्याचा राग आल्याने हनुमंतने गौरव सिंग यांना शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावरील युनिफॉर्म फाडला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले अधिक तपास करीत आहे.

पोलिस शिपायाला अपशब्द वापरणारा जेरबंद
रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले हॉटेल बंद करण्यास सांगितल्याने राग आल्यामुळे पोलिस शिपायाला अपशब्द वापरणाऱ्यास येरवडा पोलिसांनी अटक केली. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नगर रस्त्यावरील रामवाडीत घडली. सुनिल हरिभाऊ थोरात (वय ४५, रा. येरवडा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर आवारी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल गिरमकर अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –