Pune Yerwada Crime | जीव देण्याची धमकी देऊन रात्री अपरात्री घरासमोर रोडरोमियो घालतोय गोंधळ

पुणे : फोन घेतला नाही तर रात्रीअपरात्री घरासमोर येतो, स्वत:चा जीव देऊन त्यात अडविण्याची धमकी देऊन रोड रोमियो (Road Romeo) गोंधळ घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Yerwada Crime)

याप्रकणी एका २९ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०९/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोसिन शेख (वय ३२, रा. खराडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जयजवाननगर येथे मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने ६ महिन्यांपासून मित्र मैत्रिणीकडून फिर्यादीचा फोन नंबर प्राप्त करुन फोन करुन त्रास देऊ लागला. फिर्यादीने आरोपीचा फोन घेतला नाही तर रात्रीअपरात्री तो फिर्यादीच्या घरासमोर येतो. फिर्यादीला फोन करुन बाहेर भेटण्यासाठी बोलावत. असे़ नाही आली तर स्वत:चा जीव देऊन त्यांना अडकवेल, अशी धमकी देत असतो. फिर्यादी जातील त्या ठिकाणी त्यांचा पाठलाग करुन त्यांचा विनयभंग करतो. या त्रासाला कंटाळून शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक