येरवडा कारागृहातील अधिकारी अन् कर्मचार्‍यांमध्ये जुंपली, FIR दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – येरवडा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यात चांगलेच वाद झाल्याचा प्रकार समोर आला असून, ससून रुग्णालयात कर्तव्यावर लेखी आदेश दिले असताना ते अधिकाऱ्याच्या अंगावर भिरकवत धमकी दिला.

याप्रकरणी उपअधीक्षक चंद्रमणी इंदूरकर (वय 55) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्मचारी जयकुमार शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा कारागृह येथे उपअधीक्षक आहेत. तर शिंदे हा कारागृह कर्मचारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येथे तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी कर्तव्य देण्यात आले आहे. दरम्यान येथील फसवणूक आणि खंडणीच्या गुन्ह्यातील बंदी प्रकाश फाले हा सध्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. त्यासाठी तेथे कारागृह कर्मचाऱ्यास ड्युटी आहे. शिंदे याला रात्रपाळीसाठी त्याच्या ड्यूटीसाठी फिर्यादी यांनी लेखी आदेश दिले होते. मात्र शिंदे याने तेथे न जाता हे आदेश फिर्यादी यांच्या अंगावर भिरकावून टाकत त्यांनाच धमकावले. तसेच ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक कोल्लूरे हे करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like