×
Homeताज्या बातम्याPune Yevlewadi DP | येवलेवाडीचा विकास आराखडा जागांची मालकी पाहूनच केल्याची जोरदार...

Pune Yevlewadi DP | येवलेवाडीचा विकास आराखडा जागांची मालकी पाहूनच केल्याची जोरदार चर्चा; भूसंपादन झालेले नसतानाही कात्रज-कोंढवा रस्ता – टिळेकरनगर – पानसरेनगर डी.पी. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू

कोंढवा : Pune Yevlewadi DP | कात्रज – कोंढवा रस्त्याने (Katraj Kondhwa Road) टिळेकरनगर (Tilekar Nagar) मार्गे येवलेवाडी (Pune Yevlewadi DP) येथील पानसरे नगरकडे जाणार्‍या विकास आराखड्यातील सुमारे दीड कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी भूसंपादन झालेले नसताना सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष असे की या रस्त्याच्या बाजूला मोठे बांधकाम प्रकल्पांचे नियोजन असून पानसरे नगर येथे काही हेक्टर जागेवर ‘ट्रेड झोन’ साठी प्लॉटींग करण्यात आले आहे. केवळ बांधकाम व्यावसायीकांच्या फायद्यासाठी महापालिका (Pune PMC News) कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

येवलेवाडीच्या विकास आराखड्यामध्ये कात्रज कोंढवा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळून टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीतील पानसरेनगरकडे जाणारा सुमारे दीड कि.मी.चा २४ मीटर रुंदीचा रस्ता आखण्यात आला आहे. विशेष असे की हा विकास आराखडा भाजपच्या महापालिकेच्या सत्ताकाळामध्ये करण्यात आला आहे. महापालिकेने विकास आराखडा मंजूर केला असला तरी शासनाने अद्याप त्याला अंतिम मान्यता दिलेली नाही. २४ मी. रुंदीच्या या दीड कि.मी.च्या रस्त्याच्या कामासाठी ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (Pune Yevlewadi DP)

या रस्त्याच्या कामासाठी मोठ्याप्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे.
नियोजीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या बांधकाम साईटस् नियोजन आहे.
तर काही ठिकाणी इमारतींची कामेही पूर्ण झाली आहेत. बांधकाम व्यावसायीक परवानगी घेताना एफएसआय अथवा टीडीआरच्या बदल्यात जागा सोडतील मात्र काही नागरिकांचे छोट्या आकाराचे प्लॉटस् देखिल येथे असून काहीठिकाणी शेतजमीन आहे.
रस्त्यासाठी भूसंपादन झालेले नसतानाही मागील वर्षी महापालिकेने येथील जेथे भूसंपादन शक्य आहे,
त्या मधल्या पट्टयातील रस्त्याच्या कामाची २ कोटी ३३ लाख रुपयांची निविदा काढून कामही सुरू करण्यात आले आहे.
विशेष असे की कात्रज- कोंढवा रस्त्यापासून सुमारे २०० मीटरचे भूसंपादन रखडल्याने येथून केवळ चिंचोळा रस्ता आहे. तसेच पुढे येवलेवाडीकडे जाताना माउंट ब्रिजा सोसायटीच्या अलिकडे शेत जमिनीचे भूसंपादन झालेले नाही.
असे असताना मागीलवर्षी निविदा काढून कामही सुरू करण्यात आले आहे.

याठिकाणी आतापर्यंत १२० मीटर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील २५० मीटर रस्त्याच्या प्राथमिक कामाला सुरूवात झाली आहे.
या कामापोटी ठेकेदाराला आतापर्यंत १ कोटी ५५ लाख रुपये बिल देखिल अदा करण्यात आले असून रस्त्याच्याकडेला
पावसाळी गटारे, पदपथाचेही काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात येत आहे.

कात्रज- कोंढवा रस्ता ८४ मी. रुंद करण्याचे नियोजन होते.
परंतू भूसंपादनापुर्वीच महापालिकेने सुमारे १७० कोटी रुपयांच्या या कामाची निविदा एका बड्या ठेकेदाराला दिली आहे.
हा बडा ठेकेदार युती शासनातील वजनदार व्यक्तीचा निकटवर्तीय असल्याने त्याला दबावाखाली पोसण्याचे काम
महापालिका मागील सहा ते सात वर्षांपासून करत आहे.
मात्र, या रस्त्याचेही काम भूसंपादनाअभावी रखडत चालल्याने महापालिका प्रशासनाने हा रस्ता केवळ ५५ मी. रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही बाब डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी असताना प्रशासनाने भूसंपादन झालेले नसताना टिळेकरनगर मार्गे
येवलेवाडीकडे जाणार्‍या दीड कि.मी.च्या रस्त्याच्या विकसनाचे काम कोणाच्या हितासाठी आणि कोणाच्या
दबावाखाली हाती घेतले? अशी चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेड झोन व जागांची मालकी पाहूनच विकास आराखडा तयार केल्याची चर्चा

कात्रज कोंढवा रस्ता येथून टिळेकरनगर मार्गे येवलेवाडी येथील पानसरे नगर येथे जाणार्‍या रस्त्याच्या शेवटच्या टोकाला अर्थात पानसरे नगर येथे काही व्यावसायीकांनी ट्रेड झोनसाठी काही हेक्टर जागेवर प्लॉटींग केले आहे.
याठिकाणी जाण्यासाठी नव्याने विकसित करण्यात येत असलेला रस्त्याला येवलेवाडी जुन्या गावठाणातून आणखी एक पर्यायी मार्ग आहे. गावठाणातून जाणार्‍या रस्त्याचेही सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
हे काम करत असताना रस्त्याच्या कडेला पावसाळी गटारे नाहीत.
उलट काँक्रिटीकरणामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या जुनी घरे, दुकाने आणि इमारतींचे मजले रस्त्यांपेक्षा खाली गेले आहेत. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी ही दुकाने आणि घरांमध्ये शिरण्याचा धोका राहाणार आहे.
त्यामुळे केवळ ट्रेड झोन तसेच मोठ्या रिकाम्या जागांची मालकी याचा विचार करूनच येवलेवाडीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे? अशी चर्चा या परिसरात सुरू आहे.

Web Title :- Pune Yevlewadi DP | There was a strong discussion that the development plan of Yevlewadi was done by looking at the ownership of the places; Although land acquisition has not been done, Katraj-Kondhwa road – Tilekarnagar – Pansarenagar D.P. Work of cement concreting of road started

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pankaja Munde | … तर मोदीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

Chandrakant Patil | विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, चंद्रकांत पाटलांचे निर्देश

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News