Pune : पूर्ववैमनस्यातून तरुणावर भरवस्तीत कुऱ्हाडीने सपासप वार करून खून, चतुःश्रृंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून तरुणावर भरवस्तीत कुऱ्हाडीने सपासप वारकरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चतु:श्रृंगी परिसरात हा प्रकार घडला आहे.

क्षितिज वैरागर (वय 22, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैरागर व आरोपींमध्ये पूर्वीचे वाद होते. तो औंध गावात राहण्यास आहे. आज 7 वाजण्याच्या सुमारास क्षितिज हा वस्तीत थांबला होता. त्यावेळी आरोपी कुऱ्हाड घेऊन आला. तसेच त्याने क्षितिज याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर तो पसार झाला. अचानक भर वस्तीत झालेल्या या घटनेमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.