खळबळजनक ! पुण्यातील सॅलसबरी पार्कमध्ये युवकाकडून पिता-पुत्रावर अ‍ॅसिड हल्ला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – सोसायटीत बदनामकारक पोस्टर का लावले याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पितापुत्रांच्या अंगावर अ‍ॅसिड हल्ला करुन त्यांना जखमी करण्याचा प्रकार सलसबरी पार्कमधील पोर्णिमा पार्कमध्ये घडला. पोलिसांनी प्रशांत नागनाथ ढवळे (वय ३२, रा़ र्पोणिमा पार्क सोसायटी, सलसबरी पार्क) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

विष्णु भागवत गोयकर (वय २२, रा़ भूूमकरनगरजवळ, आंबेगाव रोड) व त्याचे वडिल भागवत प्रभाकर गोयकर हे दोघे जखमी झाले आहेत. वडिलांचे संपूर्ण तोंड, डोळे, छाती व खांद्यावर अ‍ॅसिड हल्ल्यामुळे गंभीर भाजून जखमी झाले आहेत. तसेच विष्णु गोयकर यांच्या छातीवर, तोंडावर व शर्टवर अ‍ॅसिड उडून त्यांना किरकोळ भाजून शर्टाला जागोजागी छिद्रे पडली आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रशांत ढवळे याने विष्णु गोयकर याच्या नावाचे बदनामीकारक पत्रके सोसायटीमध्ये लावले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी ते दोघे 17 ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता पोर्णिमा पार्क सोसायटीत गेले. प्रशांत याच्या फ्लॅटचा दरवाजा वाजविला. तेव्हा प्रशांत याने सेफ्टी डोअर न उघडता त्यांना शिवीगाळ करुन दरवाजा लावून घेतला.

त्यानंतर काही वेळातच परत येऊन एकदम दरवाजा उघडून त्यांच्या नकळत त्याने दोघांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. त्या दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. प्रशांत ढवळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like