Pune Youth Congress Protest | नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांना तात्काळ निलंबीत करा : रोहन सुरवसे पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Youth Congress Protest | नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करूनही नोंदणी महानिरीक्षक व महसूल मंत्री हे नोंदणीसाठी येणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहेत. या ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी नवीन शासकीय इमारतीसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांचा फ्लेक्स फोटो जाळुन तसेच सोनवणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. (Pune Youth Congress Protest)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने व घोषणाबाजी करत नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनावणे यांच्या निलंबनाची मागणी केली. यावेळी मोहन जोशी व रविंद्र धंगेकर यांच्यासह रोहन सुरवसे-पाटील, प्रथमेश आबनावे, चेतन अग्रवाल, प्रशांत सुरसे व इतर पदाधिकारी यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune Youth Congress Protest)

नोंदणी व मुद्रांक विभागातील उपसचिव, सचिव कक्ष अधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, उपमहानिरिक्षक, सह जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक यांचे कामकाज सीसीटीव्ही कॅमेरा अंतर्गत जनतेसाठी खुले करावे. नोंदणी महानिरीक्षक यांचेकडील ५३अ खालील प्रकरणांची शासनामार्फत चौकशी करावी व यास जबाबदार असलेले विधी अधिकारी यांना त्वरीत निलंबित करावे. वादग्रस्त डीआयजी उदयराज चव्हाण यांच्यासह जिल्हा निबंधक म्हणून ठाणे शहर येथील कार्यकाळात कल्याण डोंबिवली भागातील २७ गावातील अनधिकृत बांधकाम दस्त नोंदणी प्रकियेची, तसेच त्यांच्या कालावधीची सह जिल्हा निबंधक पालघर येथील वसई विरार बोगस दस्त नोंदणीची एसआयटीमार्फत चौकशी करून दुय्यम निबंधक व सह जिल्हा निबंधक यांच्यावर कलम ८१ खाली गुन्हे दाखल करावेत व कलम ३२ खाली शासनाचा महसूल बुडवणारे डीआयजी विजय भालेराव यांच्या औरंगाबाद येथील प्रकरणांची त्वरीत चौकशी करावी, आदी मागण्या रोहन सुरवसे पाटील यांनी केल्या.

या संदर्भात बोलतांना मोहन जोशी म्हणाले, “राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे युवक काँग्रेसचे
सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी नोंदणी विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात सातत्याने निवेदने दिली;
पाठपुरावा केला. मात्र महसूल मंत्र्यांनी या संदर्भात कोणतीही दखल घेतली नाही. तसेच, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई
केली नाही. महसूल खाते व्यवस्थित सांभाळता येत नसेल, तर विखे पाटील यांनी त्वरीत राजीनामा द्यावा.”

रविंद्र धंगेकर म्हणाले, “पुणे शहर अंतर्गत बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटा प्रमाणपत्रे या दस्तांच्या अनुषंगाने
नोंदणीकृत दस्तांची अँटी करप्शन मार्फत चौकशी करून यांत दोषी असणाऱ्या दुय्यम निबंधक व सेवानिवृत्त
सह जिल्हा निबंधक यांच्यावर कलम ८१ खाली गुन्हे दाखल करावेत.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

GST Fraud Case | कर चोरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई; दोन व्यक्तींना अटक