Pune Youth Dead Body Near Khambatki Tunnel | पुण्यातील तरुणाचा मृतदेह आढळला खंबाटकी बोगद्याजवळ, पाच दिवसांपासून होता बेपत्ता; प्रचंड खळबळ

खंडाळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Youth Dead Body Near Khambatki Tunnel | पुण्यातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात आढळून आला आहे. हा तरुण पुण्यातील बावधन (Bavdhan) येथील असून तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला आहे. ध्रुव स्वप्नील सोनावणे (वय-18 रा. बावधन, पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून तो रविवारपासून (दि.17) घरातून निघून गेला होता. (Pune Youth Dead Body Near Khambatki Tunnel)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्या वळणावर ध्रुव हा दुचाकीसह (एमएच 12 व्हियु 0878) नाल्यामध्ये पडला होता. याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी व गवत वाढल्यामुळे तो कोणालाही दिसला नाही. रस्त्याच्या कडेला असलेली झुडपे काढत असताना ध्रुव याची दुचाकी आढळून आली. त्याचा परिसरात शोध घेतला असात ध्रुव याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. (Pune Youth Dead Body Near Khambatki Tunnel)

घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघात होऊन ध्रुव सोनावणे याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अपघाताच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व खंडाळ्याचे
सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी भेट दिली. (Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कारागृहाच्या आत कैद्याने घातला 27 लाखांना गंडा; मनीऑर्डर रजिस्टरमध्ये केल्या बनावट सह्या

Pune RTO- Helmet Compulsory | पुण्यात हेल्मेट सक्ती? कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट बंधनकारक, पुण्यातील तब्बल 1744 कंपन्यांना नोटीसा