भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागिच मृत्यू झाला. उंड्री पिसोळी परिसरात ही घटना घडली आहे.

तेजस तुकाराम राउत (वय 28, रा. उरळी देवाची) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अर्जुन पवार यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस एका खासगी कंंपनीत नोकरीस होता. शुक्रवारी रात्री कामावरुन सुटल्यानंतर तो दुचाकीने घरी निघाला होता. त्यावेळी तो दगडे वस्ती परिसरात आल्यानंतर पाठिमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्याला जोरात धडक दिली. यात तो खाली पडून गंभीर जखमी झाला. गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डी. के. पवार अधिक तपास करीत आहेत.