×
Homeक्राईम स्टोरीPune : लॉ कॉलेज रस्त्यावरील डीपीत दोन्ही हात घातल्याने युवकाचा तडफडून जागीच मृत्यू

Pune : लॉ कॉलेज रस्त्यावरील डीपीत दोन्ही हात घातल्याने युवकाचा तडफडून जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भर दुपारी लॉ कॉलेज रस्त्यावर असलेल्या महावितरण इलेक्ट्रिक (डीपी) बॉक्समध्ये दोन्ही हात घातल्याने झालेल्या दुर्घटनेत एकाच जागीच तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. तो केरळचा असल्याचे समोर आले आहे.

किरण राजकुमार (वय 32, रा.त्रिवेंद्रम, केरळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, किरण हा दुपारी तीनच्या सुमारास जर्मन बेकरीसमोरील पदपथावरुन एकटाच बडबड करत चालला होता. अचानकच त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या डीपीचे दरवाजे उघडले. यानंतर त्याने दोन्ही हात डीपीमध्ये घातले आणि फ्यूजला लावलेल्या तारणा पकडले. यामुळे वीजेचा तीव्र शॉक बसला गेला व तो रस्त्यावर फेकला गेला. काहीवेळ तडफड झाल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.

दुपारची वेळ असल्याने नागरिकांनी हा प्रकार पहिला. त्यांनी डेक्कन पोलिंसांना फोन करुन माहिती दिली. यानंतर उपनिरीक्षक संदीप जाधव व त्यांचे पथकाने धाव घेतली. त्याला ससून रुग्णालयात नेले. त्याला मृत घोषीत केले. दरम्यान तीन ते चार नागरिकांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे. पोलिसांना त्याच्याकडे आरसी बुक आणि कागदपत्रे व मोबाईल मिळाला आहे. त्यावरून त्याची ओळख पटली. त्याचा मोबाईल बंद होता. तो उपनिरीक्षक जाधव यांनी चार्जिंग केला. तो सुरू केल्यानंतर त्यात शेवटचा फोन हा वडिलांना केला होता. जाधव यांनी त्या क्रमांकावर फोन केला व माहिती विचारली. यावेळी त्यांनी मुलगा असल्याचे सांगितले. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

नातेवाईक केरळमधून निघाले आहेत. त्याने असे का केले हे समजू शकलेले नाही. मात्र तो त्रिवेंद्रम येथे एका कॉलेजमध्ये उपप्राचार्य होता. पण त्याला नोकरीवरून काढले होते. त्यानंतर तो असेच फिरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, असे जाधव यांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत. तो दुचाकीवर पुण्यात आला होता.

Must Read
Related News