Advt.

पाण्याच्या टँकरच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत एका पादचारी तरुणाचा जागिच मृत्यू झाला आहे. कोंढव्यातील कैसरबाग परिसरात ही घटना शनिवारी रात्री घडली आहे.

इसाक मुस्तफा सय्यद (वय 20, रा. कैसरबाग) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी टँकर चालक योगेश कटके (वय 29, रा. कोंढवा) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक नितेश टपके यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश कटके याचे पाण्याचे टँकर आहे. तो पाणी सप्लाय करतो. चालकही तोच आहे. दरम्यान, इसाक हा कैसरबाग परिसरात राहण्यास आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास इसाक हा पायी चालत घरी जात होता. त्यावेळी पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरने त्याला जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झाला. त्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, योगेश हा घटनास्थळी न थांबता तेथून पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला सोमवारी अटक केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार डोईफोडे हे करत आहेत.