Pune : दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पावसानंतर भरधाव दुचाकी स्लीप होऊन दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. कर्वेनगर उड्डाणपूलावर हा प्रकार पंधरा दिवसांपूर्वी घडला आहे.
विनोद पुनाराम चौधरी (वय २६, रा. किश्कींदानगर, कोथरुड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक विकास जाधव यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा पंधरा दिवसांपूर्वी ( दि. ६ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरुन कर्वेनगर उड्डाणपूलावरुन जात होता. भरधाव दुचाकी घसरून रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकली. त्यामुळे विकास गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यावेळी पाऊस झाला होता. यामुळे रस्त्यावर पाणी होते व रस्ता निसरडा झाला असा, असा संशय पोलिसांना आहे. अधिक तपास वारजे पोलिस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like