एकतर्फी प्रेमातून तरुणाचा तरुणीच्या फ्लॅटवर मध्यरात्री राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मित्राच्या मैत्रिणीवर एकतर्फी प्रेम करणार्‍या यमन देशाच्या तरुणाने तिच्या फ्लॅटवर जाऊन चांगलाच राडा घातला. कपडे फाडून तिचा विनयभंग करत कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हाईथाम नावाच्या तरुणावर विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मुळची मिझोराम राज्याची आहे. नोकरीनिमित्त पुण्यात असून, एका बड्या कंपनीत नोकरी करते. दरम्यान, आरोपी हा तिच्या एका मित्राच्या माध्यमातून तोंडओळख झाली होती. त्यानंतर हा तरूण सतत तिच्या पाठलागकरून बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तरुणी त्याला टाळत होती. त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर तीन दिवसांपुर्वी तरुण मध्यरात्री तरूणी राहत असलेल्या फ्लॅटवर गेला. तसेच, तरुणीला ढकलून देऊन चांगलाच राडा घातला. याबाबत पोलीसांत किंवा इतरांना कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तेथून निघून गेला. यानंतर तरूणीने पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Visit : policenama.com

Loading...
You might also like