Pune Youth NCP | कोथरूड मधील वाहतुक कोंडी विरोधात युवक राष्ट्रवादीचे पोलिसांकडे निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Youth NCP | कोथरूड मधील गुजरात कॉलोनी (Gujrat Colony, Kothrud, Pune) व आझाद नगर परिसरातील रहिवासी व व्यापारी यांच्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने पुढाकार घेतला. अनियंत्रित आणि अनियमित वाहतुकी बद्दलच्या (Pune Traffic Jam) तक्रारी येथील रहिवासी यांनी कोथरूड युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष गिरीश गुरूनानी (Girish Gurnani ) यांच्या कडे मांडल्या होत्या. (Pune Youth NCP)
नो पार्किंग मध्ये गाड्या लावणे, पी १, पी २ चे आखलेल्या धोरणानुसार पालन न करणे, रस्त्याच्या कडेलाच चार चाकी गाड्या लावून खरेदी साठी दुकान मध्ये जाणे अश्या अनेक चिंता व त्या मुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील लोकांनी शेवटी युवक राष्ट्रवादी कडे धाव घेतली. वरील बाबींमुळे पादचाऱ्यांना अतोनात त्रास तर सहन करावाच लागतो पण त्याचसोबत त्यांच्या असुरक्षिततेची टांगती तलवार ही असते असे या लोकांनी आज गुरूनानी यांना सांगितले. (Pune Youth NCP)
या समस्यांवर त्वरित उपाय म्हणून आज कोथरूड वाहतूक पोलीस विभागातील (Kothrud Traffic Division) पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Police Inspector Jayram Paigude) यांची भेट घेऊन गुरूनानी यांनी निवेदन दिले. श्री. पायगुडे यांनी तत्काळ कारवाई करण्याची हमी यावेळी युवक राष्ट्रवादी व कोथरूड वासियांना दिलेली आहे. या वेळी माध्यमांशी बोलत असताना गुरूनानी म्हणाले “पोलिसांनी आम्हाला ही समस्या त्वरित सोडवण्याची हमी दिलेली आहे आणि मी आशा करतो की तसेच होईल
व या परिसरातील अनियंत्रित वाहतुकीची कोंडी सुटून येथील रस्ता
व पादचाऱ्यांबरोबरच येथील रहिवासी व व्यापारी देखील मोकळा श्वास घेऊन येथे वावरू शकतील.”
Web Title :- Pune Youth NCP | Youth NCP’s statement to police against traffic congestion in Kothrud
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | पुणे-मुंबई महामार्गावर अवैध मळी टँकरवर कारवाई, 23 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त