धक्कादायक ! पुण्यात मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाने ‘द एंड’ लिहून जीवन संपवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईल गेमच्या आहरी गेलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज (गुरुवारी) उघडकीस आला. हा प्रकार हवेली तालुक्यातील पेरणेफाटा येथे उघडकीस आला असून तरुणाचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले आहे. दिवाकर उर्फ संतोष धनपाल माळी (वय-१९) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. नेमक्या कोणत्या गेमच्या आहारी गेल्यामुळे संतोषने आत्महत्या केली याचा शोध लोणीकंद पोलीस करीत आहेत. यावेळी संतोषच्या आजीने मोबाईलने माझ्या राजाचा बळी घेतला असे म्हणत आक्रोश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळे कुटुंब मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावचे रहिवाशी आहे. नोकरीनिमीत्त माळी कुटुंब पेरणेफाटा येथे वास्तव्यास आहे. मृत संतोषचे वडील कंपनी काम करतात तर आई गृहणी आहे. संतोष वाघोली येथील महाविद्यालयात कॉमर्सच्या द्वितीय वर्षात शिकत होता. संतोषला मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद लागला होता. घरच्यांनी त्याला अनेकवेळा समजावू सांगितले मात्र तो मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने तो कोणाचेच ऐकत नव्हता. काही दिवसांपासून तो कॉलेजला देखील गेला नाही.

दरम्यान, आज सकाळी त्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घराची झडती घेतील त्यावेळी पोलिसांना एक चिठ्ठी सापली. या चिठ्ठीमध्ये “आवर सन विल शाईन अगेन’, “पिंजऱ्यातील ब्लॅक पँथर फ्री झाला, आता कसल्याच बंधनात राहिला नाही,’ “द एंड’ असा मजकूर तसेच कसलासा कोड लिहिलेला आढळला. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्याच्या व्हॉटसअप व फेसबुक ‘ब्लॅक पॅंथर’ या गेमचा फोटो आळून आला.