Pune : युवा सेनेचे पदाधिकारी दिपक मारटकर खून प्रकणात 10 जणांवर मोक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   बुधबार पेठेत युवा सेनेचे पदाधिकारी दिपक मारटकर खून प्रकरणात अटक केलेल्यावर 10 जणांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश दिले आहेत. गुंड बापू नायर व स्वप्नील उर्फ सतीश चॉकलेट मोडवे यांच्या टोळीशी निगडित असून, त्यांच्या सांगण्यावरून गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

अश्विनी सोपान कांबळे, निरंजन सागर म्हकाळे, राहुल श्रीनिवास रागिर, रोहित दत्तात्रय क्षीरसागर, लखन मनोहर ढावरे, महेंद्र मदनलाल सराफ, प्रशांत उर्फ सनी प्रकाश कोलते, रोहित उर्फ बाळा कमलाकर कांबळे, संदीप उर्फ मुगळ्या प्रकाश कोलते, चंद्रशेखर रामदास वाघेल अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर यांचा मध्यरात्री बुधवार पेठ परिसरात तीक्ष्ण हत्याराने वारकरून खून करण्यात आला होता. याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली होती. त्याचा तपास सुरू असताना कुविख्यात गुंड बापू नायर चॉकलेट मोडवे यांच्या टोळीशी निगडित असल्याचे दिसून आले आहे.

बापू नायर याच्या सांगण्यावरून तसेच बुधवार पेठेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरोपींना आर्थिक मदत पुरवून हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करावी असा प्रस्ताव पाठविला होता. यानुसार डॉ. संजय शिंदे यांनी त्याबाबत कागदपत्रे तपासली असता त्यात बापू नायर टोळीशी निगडित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे काम सुरू केले आहे.

You might also like