Pune Zilla Parishad | महिलांना घरमालक बनवा अन् मिळवा मालमत्ता करात सवलत, पुणे जिल्हा परिषदेची घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ZP | गृहलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या महिलांना घरांचे मालक (Women Homeowners) बनवा अन् मालमत्ता करात (Property Tax) तीन टक्के सवलत (Concession) मिळवा, अशी घोषणा पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) ग्रामपंचायत विभागाने (Gram Panchayat Department) केली आहे. जनजागृतीच्या माध्यमातून हा नवा निर्णय आपापल्या गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचवा, असा आदेश जिल्हा परिषदेने (Pune Zilla Parishad) सर्व सरपंच व ग्रामसेवकांना दिला आहे. तसेच नव्या निर्णयाबाबत कुटुंबप्रमुख आणि महिलांचे अभिप्राय नोंदवून ते 10 एप्रिल पर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.

 

जिल्हा परिषदेचा (Pune Zilla Parishad) हा उपक्रम राबवण्या मागे तिहेरी उद्देश आहे. गावा-गावातील घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव नोंदविणे, याच्या माध्यमातून महिलांना घरांची मालकी देणे आणि मिळकीत पुरुषांच्या बरोबरीने महिलांना समान हक्क मिळावा हे तीन उद्देश आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेने नवा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच पुणे जिल्ह्यातील (Pune District) निम्यापेक्षा अधिक कुटुंबातील घरांची मालकी महिलांकडे आली आहे. यासाठी गाव पातळीवर गावातील मिळकतीच्या महाफेरफार मोहीम राबविण्यात आली होती.

 

जिल्हा परिषदेने राबविलेल्या महाफेरफार मोहिमेत सहा लाख 42 हजार 86 घरांच्या सातबारा (7/12) उतारा आणि 8अ उताऱ्यावर महिलांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. महिलांच्या नावे घरांची मालकी  या मोहिमेत जिल्ह्यात सर्वाधिक जुन्नर तालुक्यात (Junnar Taluka) 77 हजार 85 महिलांना घरांची मालकी आहे. त्यामुळे जुन्नर तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. तर सर्वात कमी प्रतिसाद वेल्हे तालुक्यात (Velhe Taluka) मिळाला आहे. याठिकाणी 15,761 घरे महिलांच्या नावाने आहेत.

 

या उपक्रमाला अधिकाधिक प्रोत्साह देण्यासाठी आता मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे जिल्ह्यातील सर्व घरांच्या उताऱ्यावर पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे नाव नोंदविले जाईल, अशी जिल्हा परिषदेला अपेक्षा आहे.

अशी मिळणार सवलत

– पतीचे निधन झालेल्या महिला व तिच्या मुलींच्या नावे घर – 10 टक्के

– घर फक्त महिलांच्या नावे असल्यास -7 टक्के

– उद्योगामधील महिलांची 80 टक्के भागीदारी असलेल्या मिळकती – 7 टक्के

– 18 वर्षे पूर्ण असलेल्या अविवाहित मुलींच्या नावावरील घरे – 5 टक्के

– पती-पत्नी व सून आदींच्या संयुक्त नावावारील घरे – 3 टक्के

 

जिल्ह्यातील कुटुंबांची संख्या

– जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या – 10 लाख 91 हजार 30

– घरांची मालकी असलेल्या कुटुंबांची संख्या – 6 लाख 42 हजार 86

 

जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचाय) सचिन घाडगे (Executive Officer Sachin Ghadge) म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नोंदणी व्हावी आणि महिला या घरांच्या मालक व्हाव्यात, हा या उपक्रमाच्या अंमलबजावणी मागचा प्रमुख उद्देश आहे. जेणेकरुन महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल. यासाठी मालमत्ता करात मिळणाऱ्या उत्पन्ना घट होणार असली तरी त्याचा फायदा हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी होणार आहे.

 

Web Title :- Pune Zilla Parishad | make women homeowners three concession property tax pune zilla parishad pune zp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Keshav Upadhye | ‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंनाही तोच सल्ला दिला असता’ – केशव उपाध्ये

 

Pune Metro | पुण्यातील ‘बुधवार पेठ मेट्रो स्टेशनच्या नावात चूक ?; स्थानक ‘या’ नावाने ओळखले जाणार

 

Parbhani Crime | धक्कादायक ! पतीने घेतला गळफास तर पलंगावर पत्नीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ