Pune Zilla Parishad | जिल्हा परिषदेत सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खास मोहीम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Zilla Parishad | जिल्हा परिषद प्रशासनाने आतापर्यंत एकूण ११८३ कामकाजाच्या प्रक्रियांचे निश्चितीकरण केले आहे. या निश्चित केलेल्या प्रक्रिया सेवा हमी कायद्यांतर्गत आणण्यात येणार आहेत. त्याकरिता जिल्हा परिषदेत सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खास मोहीम राबविण्यात येत आहे. (Pune Zilla Parishad)

 

कर्नाटक राज्याच्या ‘सकल मिशन’च्या धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेमध्ये प्रायोगिक तत्वावर सेवा हमी कायदा अंमलबजावणीच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सेवा हमी कायद्यात जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा, आस्थापना विषयक बाबी यामध्ये अंतर्भूत केलेल्या नाहीत, ही बाब विचारात घेऊन जिल्हा परिषदेने याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आणि आस्थापनाविषयक बाबींची सेवा हमी कायद्याशी सांगड घातली आहे. तसेच प्रोसेस मॅपिंगच्या कामामध्ये त्याचा क्रम निश्चित करण्यात आला आहे. त्याला डिजिटल स्वरूप देण्याचे काम चालू आहे. त्यामध्ये आतापर्यंत सामान्य प्रशासन विभागाच्या २४ प्रक्रिया डिजिटल झाल्या आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. (Pune Zilla Parishad)

 

जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या प्रत्येक प्रक्रियेच्या विहित कालावधीनुसार फाईल ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे.
यामुळे एखादी फाईल कोणत्या विभागामध्ये आणि कोणत्या अधिकाऱ्याकडे किती दिवस प्रलंबित राहिली हे लक्षात येते.
फाईलचा प्रवास ठरलेल्या वेळेत होण्यासाठी फाईल ट्रॅकिंग सिस्टीम प्रभावी ठरली आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी प्रोसेस मॅपिंग प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया राबविण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेने काम केले आहे, असेही आयुष प्रसाद (IAS Ayush Prasad) यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Zilla Parishad | Special campaign for implementation of Service Guarantee Act in Zilla Parishad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai-Pune Expressway | उद्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ वेळेत ट्रॅफिक ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

 

CM Eknath Shinde | ‘पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते ?’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Pune Crime | लोणी काळभोर परिसरातील पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा, 10 जणांना अटक