पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श गोपालक पुरस्कार नितीन कुंजीर यांना प्रदान

लोणी काळभोर : पोलीसनामा –  पुणे जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाकडून दिला जाणारा आदर्श गोपालक पुरस्कार हवेली तालुक्यातील वळती येथील युवा उद्योजक नितीन सोपान कुंजीर यांना प्रदान करण्यात आला.

पूर्व हवेली हा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो परंतु वळती या गावाला केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत असे अशात केवळ पारंपारिक शेती करुन कुटुंबाच्या गरजा भागणार नाहीत म्हणून शेती पुरक व्यवसाय चालू करण्याची कल्पना येथील शेतकर्याच्या मुलाच्या मनात आली. यातून गोपालनाचा विचार रुजला आणि तो साकारला. नितीन कुंजीर यांनी आपल्या मोजक्या जमिनीचा उपयोग करुन आधुनिक पध्दतीचा वापर करुन मोठा गोठा तयार केला असून येथे गाईंचे अतिशय काळजीपूर्वक संगोपन केले जाते. सकस आहार योग्य औषधोपचार यामुळे गाईंच संगोपन उत्तम होताना दिसते.

यामुळे यावर्षीचा पुणे जिल्हा परिषद पशु सवर्धन विभागाचा सन 2018 -19 चा आदर्श गोपालक पुरस्कार नितीन कुंजीर यांना देण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवाकाते यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यामुळे या भागातील तरुणांमध्ये गोपालन व दुग्ध व्यवसायाबद्दल प्रोत्साहन मिळेल व जास्तीत जास्त तरुण याकडे वळतील असे वाटते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like