पुणेकरांच्या माथ्यावर पुणेरी पगडीचीच शान, नको हेल्मेट, पोलीस मालामाल !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वर्षाच्या सुरवातीलाच करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात आक्रमक झालेल्या पुणेकरांतर्फे हेल्मेट सक्ती निषेध मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे डोक्यावर पगडी घालून गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

नववर्षाच्या सुरवातीला म्हणजेच १ जानेवारीला पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली. इतकेच नव्हे तर वाहतूक पोलिसांकडून त्यांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आल्यानंतर तसेच त्याची कडक अंमलबजावणी केली जात असल्यामुळे आक्रमक झालेल्या पुणेकरांनी त्याचा विरोध केला.

दरम्यान पुणेकरांच्या हेल्मेट सक्तीच्या विरोधाकडे पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेनेच्या पुढाकाराने हेल्मेट विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली. दरम्यान सविनय कायदेभंग करत हेल्मेट सक्ती निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यामुळे आज ( ३ जानेवारी ) हेल्मेट विरोधी कृती समितीने हेल्मेट सक्ती विरोधात पगडी घालून निषेध मोर्चा काढला. दरम्यान  पुणेकरांचे हाल, पोलीस माला माल , हेल्मेट सक्ती हटाव पुणेकर बचाव, अशे अनेक फाळके घेऊन तसेच घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला. इतकेच नव्हे तर पोलीस आयुक्तांनी एकदा चारचाकीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून पुण्यात फिरावे, मगच हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा, असे ‘हेल्मेट सक्तीविरोधी कृती समिती’ ने म्हंटले आहे.

विशेष म्हणजे पोलीस प्रशासन हेल्मेट सक्तीबाबत ठाम असून गेल्या आठवडय़ापासूनच शहरात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत २० हजारहून अधिक  दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष कारवाईबरोबर हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांच्या शोधासाठी पोलिसांकडून शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापरही करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे या निषेध मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पाठक, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील तसेच विविध संघटनेचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत.