Puneet Balan Group-Friendship Cup | ‘फ्रेंडशिप करंडक’ सिझन 2 क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने पटकावले विजेतेपद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Puneet Balan Group-Friendship Cup | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील मानांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ सिझन २ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. (Puneet Balan Group-Friendship Cup)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात सागर आंग्रे याने केलेल्या ४० धावांच्या जोरावर साई पॉवर हिटर्स संघाने जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघाचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघाने १० षटकात ७ गडी गमावून ६४ धावांचे आव्हान उभे केले. सलामीवीर कुणाल भिलारे (२८ धावा) आणि अजिंक्य गायकवाड (२० धावा) यांनी सुरेख सुरूवात करून दिली. पण त्यांनतर साई पॉवरच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करून धावसंख्येला वेसण घातले. सागर आंग्रे (१-६) आणि मयुर लोखंडे (१-५) यांनी चमकदार गोलंदाजी केली. साई पॉवर हिटर्स संघाने हे आव्हान ६.३ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. सागर आंग्रे (नाबाद ४० धावा) आणि हरीश जाधव (नाबाद २४ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. (Puneet Balan Group-Friendship Cup)

तिसर्‍या स्थानासाठी झालेल्या सामन्यात सुशांत मते याच्या कामगिरीमुळे गुरूजी तालिम टायटन्स् संघाने तुळशीबाग टस्कर्स संघाचा १४ धावांनी पराभव केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुपचे चेअरमन पुनित बालन (Punit Balan), माणिकचंद ऑक्सिरीचच्या चेअरमन जान्हवी धारीवाल-बालन (Janhvi Dhariwal-Balan), सिने-चित्रपट क्षेत्रातील कलाकार सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्यातील मानांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक यातील मान्यवर सदस्य व सहभागी संघांचे खेळाडू आदि उपस्थित होते.

 

विजेत्या संघाला साई पॉवर हिटर्स संघाला १ लाख ५१ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघाला ७५ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. तिसर्‍या क्रमांकाच्या गुरूजी तालिम टायटन्स् संघाला ५१ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला.

या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू सागर आंग्रे (साई पॉवर हिटर्स संघ, १५२ धावा) याला २१ हजार रूपये आणि इलेट्रिकल बाईक देण्यात आली. सर्वोत्कृष्ट फलंदाज- अभिषेक राठोड (१४० धावा, नादब्रह्म ड्रमर्स), सर्वोत्कृष्ट गोलंदाज- राजेश पवार (साई पॉवर्स हिटर्स, ७ विकेट), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सागर थरकुडे
(साई पॉवर हिटर्स); सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक अतुल चव्हाण (दगडुशेठ वॉरीयर्स)
यांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. फेअर प्ले पुरस्कार कसबा सुपर किंग्ज् संघाला देण्यात आला.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः जोगेश्‍वरी जॅग्वॉर्सः १० षटकात ७ गडी बाद ६४ धावा
(कुणाल भिलारे २८, अजिंक्य गायकवाड २०, सागर आंग्रे १-६, मयुर लोखंडे १-५) पराभूत
वि. साई पॉवर हिटर्सः ६.३ षटकात २ गडी बाद ६८ धावा
(सागर आंग्रे नाबाद ४० १९, ६ चौकार, १ षटकार), हरीश जाधव नाबाद २४ (९, ३ षटकार); सामनावीरः सागर आंग्रे;

तिसर्‍या स्थानासाठीः गुरूजी तालिम टायटन्स्ः ६ षटकात २ गडी बाद ६५ धावा
(सुशांत मते नाबाद २६, सुशिल फाले नाबाद १६, पंकज मोरीवाले १-१) वि.वि. तुळशीबाग टस्कर्सः
६ षटकात ३ गडी बाद ५१ धावा (किरण पतंगे १६, मिथुन चव्हाण नाबाद १६, सुशिल फाळे १-५); सामनावीरः सुशांत मते;

Web Title :- Puneet Balan Group-Friendship Cup | Sai Power Heaters win the ‘Friendship Cup Trophy’ Season 2 Cricket Championship


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांना कोर्टाचा दणका ! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; नील सोमय्यांचा फैसला उद्या

Pune Crime | क्राईम पेट्रोल मालिका बघून रचला कट, शितपेयातून महिलेला दिल्या झोपेच्या गोळ्या; खून करुन दागिने लुटणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

Sharad Pawar-Silver Oak Attack Case | गुणरत्न सदावर्तेंना ‘कॉल’ करणारी नागपूरमधील ‘ती’ व्यक्ती कोण ? कोर्टात सुनावणीच्या वेळी दावा