पुणेकरांनो सावधान ! … येथे आहेत डेंग्यूचे डास 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
पुणे शहरातील शाळा ,महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत आढळून आले आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार , शहरातील २० महत्त्वाची महाविद्यालये आणि २० सरकारी कार्यालये यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तेथील ठिकाणांची डेंग्यू डासांची उत्पत्ती स्थळे तेथील प्रशासनाला दाखवून औषध फवारणी करण्यात आली.

[amazon_link asins=’B076BLWYP8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11700a13-8d9c-11e8-89f4-b702d92b0547′]

हे आहेत डास असलेले शाळा व महाविद्यालये आणि कार्यालये 

 मुक्तांगण हायस्कूल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, सेंट मीरा हायस्कूल, सिम्बायोसिस महाविद्यालय (विमानतळ रस्ता )  समावेश आहे. त्याच बरोबर सरकारी कार्यालयांमध्ये देखील डेंग्यूची उत्पत्तीस्थळे आढळली असून त्यामध्ये पोलिस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, आणि काही पोलीस ठाणे अशा महत्त्वाच्या कार्यालयांचा यात समावेश आहे.

काय करावे काय टाळावे

  • आठवड्यातून किमान एकदा कूलर्समधून आणि इतर लहान भांड्यामधून पाणी काढून टाकावे
  • दिवसा डास चावू नयेत म्हणून एरोसोलचा वापर केला पाहिजे
  • पूर्ण शरीर झाकले जाईल असा पोशाख परिधान करा
  • मुलांना लहान अर्धे  कपडे घालून खेळू देऊ नका
  • दिवसा झोपतेवेळी मच्छरदाणी किंवा डास निवारक वापरावे.[amazon_link asins=’B07F83WRJS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’23836c24-8d9c-11e8-b7b6-416618db879f’]