Corona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) आटोक्यात येत आहे. देश अजूनही कोरोना व्हायरस (Corona virus Pandemic) महामारीचा सामना करत आहे. आता केंद्र सरकारकडून (Central Government) तिसरी लाटेची third wave तयारी सुरु झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, मूलभूत पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी हे मॉड्यूलर रुग्णालये (Modular hospitals) बांधली जातील. सध्याच्या रुग्णालयातील विद्यमान पायाभूत सुविधांचा भार (Operational Infrastructure) कमी व्हावा या उद्देशानं या मॉड्यूलर रुग्णालयांची बांधणी होईल. केंद्र सरकार येत्या दोन ते तीन महिन्यात देशभरात ५० इनोव्हेटिव्ह मॉड्यूलर (Innovative Modular Hospitals) रुग्णालये सुरु करण्याचा विचार करत आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुण्यासह या ठिकाणी मॉड्यूलर रुग्णालय

रिपोर्टनुसार, येत्या 6 ते 7 आठवड्यात हे रुग्णालय  पूर्णपणे कार्यरत होतील.
यात पहिल्या टप्प्यात बिलासपूर, अमरावती, पुणे, जालना आणि मोहालीमध्ये (Bilaspur, Amravati, Pune, Jalna and Mohali) 100 बेड्स मॉड्यूलर रुग्णालय बनेल.
रायपूरमध्ये (Raipur) 20 बेड्सचं रुग्णालय बनेल.
तर बंगळुरूमध्ये (Bangalore) 20, 50 आणि 100 बेड्सचं एक- एक रुग्णालय तयार करण्यात येईल.
आयसीच्या 100 बेड्ससोबत 50 मॉड्यूलर रुग्णालये तयार केले जातील.
तीन आठवड्यात बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयांना जवळपास 3 कोटींच्या आसपास खर्च होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मॉड्यूलर रुग्णालय म्हणजे काय ?

मॉड्यूलर रुग्णालय म्हणजे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार Expansion of hospital infrastructure आहे आणि आता विद्यमान रुग्णालयाच्या इमारती शेजारीच ही रुग्णालयते बांधले जाऊ शकते.
देशाच्या विविध भागात (different parts of the country) कोविड -19 चे (Covid-19) रुग्ण वाढल्यानं रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव होता.
त्यामुळे मॉड्यूलर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णालयांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे ही मॉड्यूलर रुग्णालय पुढचे 25 वर्षापर्यंत टिकू शकतात.
तसंच एका आठवड्यापेक्षा कमी वेळेत नष्टही केले जाऊ शकतात आणि कुठंही घेऊन जाऊ शकतात.

Web Title : Punekars will benefit corona virus india third wave centre will set up 50 modular hospitals

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?