वाढदिवसाला जाणे पुण्याच्या ३३ युवकांच्या आले ‘अंगलट’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – राजकीय आश्रय असलेल्या गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यातून ३३ युवक आले. या टोळीकडे घातक शस्त्रे असल्याची कुणकुण लागल्याने पोलिसांनी हॉटेलवर छापा घातला. पण राजकीय वरदहस्तामुळे भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ते थोडक्यात बचावले.

यवतमाळमधील दारव्हा मार्गावरील एका हॉटेलात सोमवारी दुपारी पोलीस पथक झाडाझडती घेत होते. तेव्हा भाजपातील एक उच्चशिक्षित पदाधिकारी तेथे पोहोचला व त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

येथील एका गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस असल्याने त्यासाठी पुण्यातील ३३ युवक चार आलिशान गाड्या घेऊन यवतमाळात दाखल झाले. यातील अनेकांवर विविध ठिकाणी गंभीर गुन्हे असल्याची माहिती मिळाली. चौकशी करण्यासाठी ‘एलसीबी’तील तो अधिकारी पथकासह दारव्हा मार्गावरील हॉटेलमध्ये गेला. त्याने आलेल्या युवकांची चौकशी करत त्यांचे नाव, मोबाईल नंबर लिहून घेण्यास सुरूवात केली.

याची माहिती मिळताच भाजप पदाधिकाऱ्यांने फोन करून पोलीस अधिकाऱ्यांला चौकशीपासून थांबविण्याचा प्रयत्न केला. फोनला दाद न दिल्याने हा पदाधिकारी थेट हॉटेलमध्ये पोहोचला.
पोलीस कारवाईत अडथळा आणू नका, केवळ औपचारिक चौकशीच सुरू आहे, असे सांगूनही हा भाजपा पदाधिकारी ऐकण्यास तयार नव्हता.

पोलीस अधिकारी व पदाधिकाऱ्यांत शाब्दिक खडाजंगी झाली. मात्र दबंग अधिकाऱ्याने कारवाई करत ३३ युवकांविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केली. या युवकांजवळ घातक शस्त्रसाठा असण्याचा संशय पोलिसांना होता. कारवाईत खोळंबा झाल्याने पोलिसांच्या हाती काही लागले नाही. पण तोपर्यंत या पुण्यातील युवकांची चांगलीच फाटली होती. कुठून इतक्या लांब केवळ वाढदिवसासाठी आलो, असे त्यांना होऊन गेले होते.

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

नारळपाणी घ्या आणि ‘थायरॉईड हार्मोन्स’ नियंत्रणात ठेवा

लहान मुलांची माती-खडू खाण्याची सवय मोडण्यासाठी करा ‘हे’ उपाय