पुण्यातील ‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मृतदेह कॅनलमध्ये सापडला 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जनता वसाहत परिसरातून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह बुधवारी दुपारी स्वारगेट येथील कॅनलमध्ये संशयास्पदरित्या आढळून आला. पोलीसांनी अग्निशमन दलाच्या मदतनीने मृतदेह पाण्याबाहेर काढून तो ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला आहे.

आकाश कालीदास मिसाळे (२४, जनता वसाहत) असे तरुणाचे नाव आहे. तो कालपासून बेपत्ता असल्याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. आकाश मिसाळे हा जनता वसाहत परिसरात राहण्यास आहे. तो कालपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह स्वारगेट कॅनलमध्ये आढळून आला. याची माहिती स्थानिकांनी स्वारगेट पोलिसांना दिली. त्यानंतर स्वारगेट पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून तो ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.