पुणेरी पठ्ठयाचा अटकेपार झेंडा ! लढवणार जपानमध्ये निवडणूक

जपानमध्ये प्रथमच भारतीय नागरिक निवडणुकीच्या रिंगणात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मूळ पुण्याचे नागरिक असलेले योगेंद्र पुराणिक जपानमध्ये निवडणूक लढवणार आहेत. २१ एप्रिलला जपानमध्ये महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून २२ एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. पुराणिक हे जपानमधून निवडणूक लढवणारे पहिलेच भारतीय ठरले आहेत.

जपानमधील एदोगावा महापालिका निवडणुकीचं तिकीट योगेंद्र पुराणिक यांना मिळालं आहे. योगेंद्र हे मूळ पुण्याचे असून १९९७ साली ते शिक्षणानिमित्त जपानला गेले. बँकिंग क्षेत्रात नोकरी केल्यानंतर ते जपानच्या राजकारणात उतरले आहेत. योगेंद्र पुराणिक हे कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान या विरोधी पक्षाकडून निवडणूक लढत आहेत.

निवडणुकीविषयी प्रतिक्रिया देताना योगेंद्र पुराणिक म्हणाले की, ‘बिगर जपानी आणि स्थानिक जपानी नागरिक यांच्यातला दुरावा कमी होऊन एकोपा वाढावा, जपानी स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला वाव मिळावा, जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या पेन्शनचा प्रश्न सुटावा, यासाठी आपण राजकारणात प्रवेश केलं आहे.’

You might also like