Punit Balan Celebrity League – PBCL | पहिली ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा ! प्रतापगड वॉरीयर्स, पन्हाळा पँथर्स संघांचा विजयाचा डबल धमाका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Celebrity League – PBCL | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पहिल्या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट (Punit Balan Celebrity League – PBCL) स्पर्धेत प्रतापगड वॉरीयर्स संघ आणि पन्हाळा पँथर्स संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला.

लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार व सलामीवीर शिखर ठाकूर याने फटकावलेल्या ४२ धावांच्या जोरावर पन्हाळा पँथर्स संघाने सिंहगड स्ट्रायकर्स संघाचा १० गडी राखून सहज पराभव करत सलग दोन विजयांची नोंद केली.
सिंहगड स्ट्रायकर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकामध्ये ६ गडी गमावून ७१ धावांचे आव्हान उभे केले.
तेजस देवोसकर (नाबाद २६ धावा) आणि अशोक देसाई (१० धावा) यांनी संघाच्या डावाला आकार देऊन आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.
शिखर ठाकूर याने १९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४२ धावांची खेळी केली.
तसेच आर्दश वैद्य याने नाबाद १६ धावांची खेळी केली.
यांच्या फलंदाजीमुळे पन्हाळा पँथर्स संघाने हे आव्हान ६ षटकात पूर्ण केले. (Punit Balan Celebrity League – PBCL)

गौरव देशमुख याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर प्रतापगड वॉरीयर्स संघाने रायगड रॉयल्स् संघाचा १० गडी राखून एकतर्फी पराभव करत सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली.
पहिल्यांदा फलंदाजी करताना रायगड रॉयल्स् संघाने १० षटकामध्ये ५ गडी गमावून ५६ धावा धावफलकावर लावल्या.
अजिंक्य जाधव याने २३ धावा तर, ऋतुराज फडके याने १० धावा करून संघाचा डाव सावरला.
गौरव देशमुख याने ७ धावात २ गडी बाद करून रायगड संघाच्या डावाला खिंडार पाडले.
तसेच सागर फाटक (१-९) व पुनित बालन (१-११) यांनीही चमकदार गोलंदाजी केली.
हे आव्हान विज्ञान माने (नाबाद ३२ धावा) व माधव देवचक्के (नाबाद १० धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर प्रतापगड वॉरीयर्सने ५.३ षटकात सहज पूर्ण केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : गटसाखळी फेरी –

सिंहगड स्ट्रायकर्स : १० षटकात ६ गडी बाद ७१ धावा (तेजस देवोसकर नाबाद २६, अशोक देसाई १०, अभिजीत कवठाळकर २-९, जय दुधाणे १-११) पराभूत वि. पन्हाळा पँथर्स : ६ षटकात बिनबाद ७२ धावा (शिखर ठाकूर नाबाद ४२ (१९, ५ चौकार, ३ षटकार), आर्दश वैद्य नाबाद १६); सामनावीर : शिखर ठाकूर;

 

रायगड रॉयल्स् : १० षटकात ५ गडी बाद ५६ धावा (अजिंक्य जाधव २३, ऋतुराज फडके १०, गौरव देशमुख २-७, सागर फाटक १-९, पुनित बालन १-११) पराभूत वि. प्रतापगड वॉरीयर्स : ५.३ षटकात बिनबाद ५८ धावा (विज्ञान माने नाबाद ३२ (१८, ६ चौकार), माधव देवचक्के नाबाद १०); सामनावीर :  गौरव देशमुख;

Web Title :-  Punit Balan Celebrity League – PBCL | First Puneet Balan Celebrity League Cricket Tournament Pratapgad Warriors Panhala Panthers double victory

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chitra Wagh | आशिष शेलारांना धमकी मिळाल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या – ‘मुख्यमंत्री अजूनही हॉलिडे मूडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मूडमध्ये’

 

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे उघडा अकाऊंट, दर महिना मिळेल 2500 रुपयांची उत्पन्न; जाणून घ्या

 

Pune Corona | चिंताजनक ! शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 11 हजारांहून अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2471 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी