Punit Balan Celebrity League (PBCL) | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा ! तोरणा लायन्स्, पन्हाळा जॅग्वॉर्स, रायगड पँथर्स, सिंहगड स्ट्रायकर्स उपांत्य फेरीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Celebrity League (PBCL) | मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धेत तोरणा लायन्स्, पन्हाळा जॅग्वॉर्स, रायगड पँथर्स आणि सिंहगड स्ट्रायकर्स संघांनी गुण आणि सरस धावगतीच्या आधारे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Punit Balan Celebrity League (PBCL)

 

पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्वारगेट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत शिखर ठाकूर याच्या ५७ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर तोरणा लायन्स् संघाने प्रतापगड टायगर्स संघाचा २४ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना तोरणा लायन्स्ने ११० धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये शिखर ठाकूर याने ५७ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हाना समोर प्रतापगड टायगर्स संघाचा डाव ८६ धावांवर मर्यादित राहीला. हर्षद अटकरी (३० धावा) आणि कर्णधार शरद केळकर (२५ धावा) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. (Punit Balan Celebrity League (PBCL)

सिद्धांत मुळे याच्या ४५ धावांच्या जोरावर पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने सिंहगड स्ट्रायकर्स संघाचा ४८ धावांनी सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने सिद्धांत मुळे (४५ धावा), जय दुधाणे (३९ धावा) आणि अमित खेडेकर (२२ धावा) यांच्या फलंदाजीमुळे १२४ धावा धावफलकावर लावल्या. याला उत्तर देताना सिंहगड स्ट्रायकर्स संघाचा डाव ७६ धावा मर्यादित राहीला.

अजिंक्य जाधव याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रायगड पँथर्स संघाने पन्हाळा जॅग्वॉर्स संघाचा ४० धावांनी सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. रायगड पँथर्स संघाने गौरव देशमुख (४० धावा), अजिंक्य जाधव (३८ धावा) आणि देवेंद्र गायकवाड (२३ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १२० धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना पन्हाळा जॅग्वॉर्स संघाचा डाव ८० धावांवर मर्यादित राहीला.

 

कर्णधार सिद्धार्थ जाधव याच्या फलंदाजीच्या जोरावर सिंहगड स्ट्रायकर्स संघाने रायगड पँथर्स संघाचा नऊ गडी राखून पराभव करत सरस धावगतीच्या आधारे उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.

 

विनय राऊल याच्या फलंदाजीच्या जोरावर प्रतापगड टायगर्स संघाने शिनवेरी रॉयल्स् संघाचा ३२ धावांनी पराभव करून विजयी कामगिरी केली.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पन्हाळा जॅग्वॉर्सः १० षटकात ३ गडी बाद १२४ धावा (सिद्धांत मुळे ४५ (२४, ४ चौकार), जय दुधाणे ३९ (२०, ५ चौकार,
१ षटकार), अमित खेडेकर २२) वि.वि. सिंहगड स्ट्रायकर्सः १० षटकात ६ गडी बाद ७६ धावा (अशोक देसाई २१,
सुमित कोमुलेकर १२, सिद्धांत मुळे २-८, शुभांकर एकबोटे २-१९); सामनावीरः सिद्धांत मुळे;

प्रतापगड टायगर्सः १० षटकात ५ गडी बाद ९४ धावा (विनय राऊल ३६ (१५, ४ चौकार, १ षटकार), राहूल गोरे १९,
आदिश वैद्य १४, संदीप जुवाटकर २-९, विकास पाटील १-१२) वि.वि. शिवनेरी रॉयल्स्ः ९.५ षटकात १० गडी बाद ६२
धावा (अभिषेक रहाळकर १३, विवेक गोरे ३-६, विनय राऊल ३-९); सामनावीरः विनय राऊल;

 

तोरणा लायन्स्ः १० षटकात ६ गडी बाद ११० धावा (शिखर ठाकूर ५७ (२६, ५ चौकार, ३ षटकार), माधव देवचक्के १२,
विवेक गोरे ३-२०, विनय राऊल २-२१) वि.वि. प्रतापगड टायगर्सः १० षटकात ६ गडी बाद ८६ धावा (हर्षद अटकरी ३०,
शरद केळकर २५, विनय राऊल १४, संजय नार्वेकर २-३, संजय जाधव २-२४); सामनावीरः शिखर ठाकूर;

 

रायगड पँथर्सः १० षटकात ४ गडी बाद १२० धावा (गौरव देशमुख ४० (२६, ७ चौकार), अजिंक्य जाधव ३८ (१८,
४ चौकार, २ षटकार), देवेंद्र गायकवाड २३, जय दुधाणे १-१५) वि.वि. पन्हाळा जॅग्वॉर्सः १० षटकात ५ गडी बाद ८० धावा (सिद्धांत मुळे २९, अमित खेडेकर २०,
राया अभ्यंकर २-१२, सागर पाठक १-१२); सामनावीरः अजिंक्य जाधव;

 

Web Title :- Punit Balan Celebrity League (PBCL) | Second ‘Punit Balan Celebrity League’ Cricket Tournament! Torna Lions, Panhala Jaguars, Raigad Panthers, Sinhagad Strikers in semi-finals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Jalgaon Crime | जळगाव हादरलं! 16 वर्षीय मुलासोबत आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य