Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब संघांची विजयी घौडदौड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group | स्पोर्ट्सफिल्डस् मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ आणि द क्रिकेटर्स क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत तिसरा विजय मिळवला. (Punit Balan Group)

लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत संकर्षण खांडेकर याने केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट क्लब संघाने मास्टर्स क्रिकेट क्लबचा २ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मास्टर्स क्रिकेट क्लबने २० षटकामध्ये १३२ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये श्रवण राठोड (४४ धावा), पार्थ अगरवाल (नाबाद २९ धावा) आणि वेदांत गोरे (२२ धावा) यांनी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. संकर्षण खांडेकर याने २० धावात ३ गडी टिपले. हे आव्हान आर्यन्स् क्रिकेट क्लबने २० षटकात व ८ गडी गमावून पूर्ण केले. यामध्ये कर्णधार अव्देत सी. याने महत्वाचा वाटा उचलला ४१ धावांचे योगदान दिले. यासह अर्णव पाटील (१४ धावा) आणि आयुश गोसावी (१४ धावा) यांनी कर्णधाराला योग्य साथ दिली. (Punit Balan Group)

दुसर्‍या कमी धावांच्या झालेल्या सामन्यात द क्रिकेटर्स क्लब संघाने जलदगती गोलंदाज महेश्‍वर वाघ याच्या गोलंदाजीमुळे एफ३ स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून सहज पराभव केला. एफ३ स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात केवळ ७५ धावा जमा केल्या. यामध्ये सुर्या निकम याने सर्वाधिक ३९ धावा काढल्या. तर, २६ अवांतर धावांची मदत मिळाली. महेश्‍वर वाघ याने ५ धावात ३ गडी टिपत एफ३ संघाच्या डावाला खिंडार पाडले. द क्रिकेटर्स क्लबने हे आव्हान आर्यन भामरे (३१ धावा) आणि प्रेम इघे (१६ धावा) यांच्या फलंदाजीमुळे १०.१ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः

मास्टर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद १३२ धावा (श्रवण राठोड ४४, पार्थ अगरवाल नाबाद २९, वेदांत गोरे २२, संकर्षण खांडेकर ३-२०, अभ्युदय दहीभाते २-२६) पराभूत वि. आर्यन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद १३३ धावा (अव्देत सी. ४१, अर्णव पाटील १४, आयुश गोसावी १४, श्रेयस राठोड २-२४); सामनावीरः संकर्षण खांडेकर;

एफ३ स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद ७५ धावा (सुर्या निकम ३९, अवांतर धावा २६, महेश्‍वर वाघ ३-५, श्रीदीप अधागळे २-१८) पराभूत वि. द क्रिकेटर्स क्लबः १०.१ षटकात २ गडी बाद ७६ धावा (आर्यन भामरे ३१, प्रेम इघे १६, अवनिश निकम १-२७); सामनावीरः महेश्‍वर वाघ;

Web Title : Punit Balan Group | First ‘Balan Trophy’ U-12 Under-12 Cricket Tournament! Aryans Cricket Academy,
The Cricketers Club team’s winning race

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात