Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब संघांची विजयी सलामी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Punit Balan Group | स्पोर्ट्सफिल्डस् मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि द क्रिकेटर्स क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. (Punit Balan Group)

लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार अन्श टिल्लु याने केलेल्या अष्टपैलू खेळीमुळे गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने विस्ड्म क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा केवळ पाच धावाने पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने अर्जुन देशमुख (२० धावा), समवाद गायकवाड (२४ धावा) आणि अन्श टिल्लु (नाबाद ११ धावा) यांच्या फलंदाजीमुळे २० षटकात ३ गडी गमावून ११५ धावांचे आव्हान उभे केले. प्रतिउत्तरात विस्ड्म क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव २० षटकात ११० धावांवर मर्यादित राहीला. (Punit Balan Group)

कर्णधार प्रेम लाघे याने केलेल्या ५८ धावांच्या जोरावर द क्रिकेटर्स क्लब संघाने पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १२ धावांनी पराभव करून स्पर्धेत शानदार सुरूवात केली. कर्णधार प्रेम लाघे याच्या नाबाद ५८ धावांच्या जोरावर द क्रिकेटर्स क्लब संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ४ गडी गमावून १२६ धावा धावफलकावर लावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला २० षटकामध्ये ११४ धावा करता आल्या.

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः

गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ३ गडी बाद ११५ धावा (अर्जुन देशमुख २०, समवाद गायकवाड २४, अन्श टिल्लु नाबाद ११, सुवेद धुमाळ १-६) वि.वि. विस्ड्म क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ६ गडी बाद ११० धावा (पृथ्वीराज खांडवे २५, श्रवण कावड २२, राशी व्यास २-११, अन्श टिल्लु १-१५); सामनावीरः अन्श टिल्लु;

 

द क्रिकेटर्स क्लबः २० षटकात ४ गडी बाद १२६ धावा (प्रेम लाघे नाबाद ५८ (५१, ८ चौकार), तेजस पाठारे १४, पारूष भागवत १-१६) वि.वि. पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ४ गडी बाद ११४ धावा (अर्जुन डोंगरे २२, देवाशिष घोडके २१, हर्ष पाश्ते १९, महेश्‍वर वाघ २-१५); सामनावीरः प्रेम लाघे;

Web Title :-  Punit Balan Group | First ‘Balan Trophy’ U 12 Under 12 Cricket Tournament! Gary Kirsten Cricket Academy, The Cricketers Club teams opener victory!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे पोलिसांकडून ‘कालीचरण महाराज’ला अटक, पथक रायपूरहून पुण्याकडे रवाना

Weight Loss Mistakes | तुम्हाला जर वजन कमी करायचंय तर मग 2022 मध्ये ‘या’ चूका अजिबात करू नका, जाणून घ्या

Red Strips on Medicine | सावधान ! औषधाच्या पॅकेटवर लाल पट्टीचा अर्थ काय, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Tips for Beautiful Nails | पिवळ्या नखांवर करा 5 मिनटात घरगुती उपाय आणि मिळवा सुंदर चमकदार पांढरे नख

PBCL | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार, दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेल्या पहिल्या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा 6 जानेवारी पासून