Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब संघांचा दुसरा विजय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group | स्पोर्ट्सफिल्डस् मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ आणि द क्रिकेटर्स क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. (Punit Balan Group)

लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत द क्रिकेटर्स क्लब संघाने अर्जुन चेपे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ८५ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना द क्रिकेटर्स क्लबने २० षटकामध्ये १२६ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये अर्पित कोकटे याने नाबाद ४६ धावांची खेळी केली. अर्पित आणि गौरव गायकवाड (२४ धावा) या दोघांनी ४८ चेंडूत ६६ धावांची सलामी देत संघाला भक्कम सुरूवात करून दिली. या आव्हानाला उत्तर देताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा डाव ४१ धावांवर आटोपला. विजयी संघाचा गोलंदाज अर्जुन चेपे याने १३ धावात ४ गडी बाद करून अफलातून गोलंदाजी केली व संघाला सहज विजय मिळवून दिला. (Punit Balan Group)

अव्देत वाणी याच्या ६७ धावांच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा २३ धावांनी पराभव करून सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १५१ धावांचे आव्हान उभे केले.
अव्देत वाणी याने ६७ धावा आणि दिव्या वाय. हिने ३८ धावांचे योगदान दिले.
या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ७७ चेंडूत ९५ धावांची भागिदारी केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा डाव १२८ धावांवर मर्यादित राहीला.
सार्थक शिंदे (३४ धावा) आणि हर्ष पाश्ते (३१ धावा) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही.

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः

द क्रिकेटर्स क्लबः  २० षटकात ४ गडी बाद १२६ धावा (अर्पित कोकटे नाबाद ४६ (५०, ४ चौकार), गौरव गायकवाड २४, अर्जुन सोनार १५,
साहील कांबळे १-१९); (भागिदारीः पहिल्या गड्यासाठी अर्पित आणि गौरव ६६ (४८)

वि.वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १४.१ षटकात १० गडी बाद ४१ धावा (अर्जुन देशमुख १२, अर्जुन चेपे ४-१३, अर्जुन सोनार २-१०);
सामनावीरः अर्जुन चेपे; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद १५१ धावा (अव्देत वाणी ६७ (४९, १० चौकार, १ षटकार), दिव्या वाय. ३८, हर्ष पाश्ते १-५);(भागिदारीः अव्देत आणि दिव्या यांच्यात तिसर्‍या गड्यासाठी ९५ (७७) वि.वि. पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ४ गडी बाद १२८ धावा (सार्थक शिंदे ३४, हर्ष पाश्ते ३१, देवांशिष घोडके १४, अर्जुन डोंगरे नाबाद १६, मयांक फुलझाळके १-२५); सामनावीरः अव्देत वाणी;

Web Title : Punit Balan Group | First ‘Balan Trophy’ Under-12 Cricket Championship! Second win for Aryans Cricket Academy, The Cricketers Club

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार