पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे पुण्यातील नामांकित गणपती मंडळ (Famous Ganesh Mandal In Pune), नवरात्र मंडळ (Famous Navratra Mandal In Pune), ढोल-ताशा पथकांच्या (Famous Dhol Tasha Pathak In Pune) संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ (Friendship Cup) सीजन 2 क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ७ ते १० एप्रिल २०२२ या कालावधीत दिवस-रात्र सामने होणार असून स्पर्धेत विविध मंडळांचे १८ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. (Punit Balan Group)
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन (Punit Balan) यांनी सांगितले की, सार्वजनिक गणपती आणि नवरात्र मंडळांचा समावेश असलेली भारतातील ही पहिलीच आणि नाविन्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा असणार आहे. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेचा हा सलग दुसरा मौसम आहे. नामांकित गणेश मंडळ, नवरात्र मंडळ, ढोलताशा पथकांचे १८ निमंत्रित संघ पहिल्यांदाच एका क्रिकेट स्पर्धेत भाग घेणार असून हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. (Punit Balan Group)
पुण्यातील मानाचे आणि नामांकित गणपती मंडळातील कसबा गणपती मडळ, श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरूजी तालिम मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, गरूड गणपती मंडळ या गणपती मंडळांसह श्री साई मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी मंदिर, शितळादेवी मित्र मंडळ, युवा वाद्य पथक, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक आणि पुण्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार यांच्या क्रिकेट संघांचा स्पर्धेत समावेश आहे.
या स्पर्धेचे सामने मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर होणार आहे. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या स्पर्धेत १८ संघांपैकी अव्वल ८ संघ बाद फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत.
कसबा सुपर किंग्ज्, दगडूशेठ वॉरीयर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, शितळादेवी सुपरनोव्हाज्, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, युवा योध्दाज्, श्रीराम पथक, नादब्रम्ह सर्ववादक, तुळशीबाग टस्कर्स, राजाराम रायडर्स, मंडई मास्टर्स, रंगारी रॉयल्स्, गरूड स्ट्रायकर्स, मिडीया रायटर्स, मिडीया शुटर्स, नादब्रह्म ड्रमर्स, साई पॉवर असे १८ निमंत्रित संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्पर्धेत एकूण साडेपाच लाख रूपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.
विजेत्या संघाला १ लाख ५१ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला ७५ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे.
तिसर्या क्रमांकाच्या संघाला ५१ हजार रूपये आणि करंडक देण्यात येणार आहे.
या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना २१ हजार रूपये आणि इलेट्रिकल बाईक देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर ठरणार्या खेळाडूला रोख तीन हजार रूपये अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.
Web Title :- Punit Balan Group | Friendship Cup cricket championships to be held from April 7; 18 teams of reputed famous Ganpati Mandal, Navratra Mandal, Dhol-Tasha groups from Pune included!
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update