Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group | स्पोर्ट्सफिल्डस् मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि द क्रिकेटर्स क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. (Punit Balan Group)

 

लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अर्णव पाटील याच्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली.
पहिल्यांदा फलंदाजी करताना पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने सार्थक शिंदे (५१ धावा) आणि इरा जे. (३३) यांच्या फलंदाजीमुळे २५ षटकात १५२ धावा धावफलकावर लावल्या. अर्णव पाटील याच्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ही धावसंख्या १९.४ षटकामध्ये आणि २ गडी गमावून पूर्ण केली.
अर्णव आणि आयुष गोसावी (२७ धावा) या दोघांनी ६० चेंडूत ७८ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला.
अर्णव याने संघाला विजय मिळवून देत अंतिम फेरीत पोचवले. (Punit Balan Group)

 

अर्जुन सोनार याच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर द क्रिकेटर्स क्लब संघाने मास्टर्स क्रिकेट क्लबचा ९ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली.
अर्जुन सोनार याने १९ धावात ५ गडी टिपले आणि मास्टर्स क्रिकेट क्लब संघाच्या डावाला खिंडार पाडले.
मास्टर्स संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ७७ धावाच जमविता आल्या.
द क्रिकेटर्स क्लब हे आव्हान १ गडी गमावून पूर्ण केले.
प्रेम इघे (३२ धावा) आणि आर्यन भामरे (२७ धावा) यांनी संघाचा विजय सोपा केला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्य फेरी :

पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी : २५ षटकात ६ गडी बाद १५२ धावा (सार्थक शिंदे ५१ (४३, ५ चौकार, १ षटकार),
इरा जे. ३३, अभ्युदय दहीभाते २-२४, मयांक फुलझालके २-२५)

पराभूत वि. आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी : १९. ४ षटकात २ गडी बाद १५३ धावा (अर्णव पाटील नाबाद ७४ (५४, ११ चौकार),
आयुष गोसावी २७); (भागिदारी : पहिल्या गड्यासाठी आयुष आणि अर्णव ७८ (६०); सामनावीर : अर्णव पाटील;

मास्टर्स क्रिकेट क्लब : १५.५ षटकात १० गडी बाद ७७ धावा (पार्थ अगरवाल २५, वेदांत गोरे २७, अर्जुन सोनार ५-१९, ओम सानप २-२४)

पराभूत वि. द क्रिकेटर्स क्लब : १८.१ षटकात १ गडी बाद ७८ धावा (प्रेम इघे ३२, आर्यन भामरे २७, वेदांत गोरे १-१७); सामनावीर: अर्जुन सोनार;

 

Web Title :- Punit Balan Group | The first Balan Trophy to win the under 12 cricket tournament Aryans Cricket Academy vs The Cricketers Club for the title

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा