Punit Balan Group | पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; हेरंब क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांचा सलग दुसरा विजय !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Punit Balan Group | स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत हेरंब क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. (Punit Balan Group)

 

लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत क्षितीज चव्हाण याच्या ६१ धावांच्या जोरावर ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा केवळ ५ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला.
ब्रिलीयंट्स अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६ षटकात ९ गडी बाद १३८ धावा, अशी मजल मारली.
क्षितीज चव्हाण याने ६१ धावा तर, साईराज शेलार (२३ धावा) आणि आदित्य कपारे (२१ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला.
पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने सावध खेळ करताना आव्हानाचा पाठलाग सुरू केला.
पण ऐन मोक्याच्या क्षणी त्यांचे फलंदाज बाद झाले व संघाला ५ धावांनी पराभव स्विकारावा लागला.
पेस अ‍ॅथलेटीक संघाचा डाव २६ षटकात १३३ धावांवर मर्यादित राहीला. आदित्य हराळे (३८ धावा),
प्रेम कांबळे (नाबाद २८ धावा) व सार्थक शिंदे (२६ धावा) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. (Punit Balan Group)

 

सुमित साळुंके याच्या ८७ धावांच्या जोरावर हेरंब क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने निंबाळकर रॉयल्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ६० धावांनी पराभव केला.
हेरंब क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३० षटकामध्ये ६ गडी गमावून १४४ धावांचे आव्हान उभे केले.
यामध्ये सुमित साळुंके (८७ धावा) आणि अ‍ॅरॉन बिनु (३५ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला.
या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी १२९ चेंडूत १२१ धावांची भागिदारी रचली.
या आव्हानाला उत्तर देताना निंबाळकर रॉयल्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ८४ धावांवर आटोपला.

 

सामन्याचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः

 

१) ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः २६ षटकात ९ गडी बाद १३८ धावा (क्षितीज चव्हाण ६१ (४९, ७ चौकार), साईराज शेलार २३, आदित्य कपारे २१, श्रेयस शिवारकर २-११,
अर्जुन सोनार २-१५);(भागिदारी- तिसर्‍या गड्यासाठी साईराज आणि क्षितीज यांच्यात ६३ (५४) वि.वि. पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २६ षटकात ६ गडी बाद १३३ धावा
(आदित्य हराळे ३८, प्रेम कांबळे नाबाद २८, सार्थक शिंदे २६, साईराज शेलार २-२६, शिवराज सुर्यवंशी २-२४); सामनावीरः क्षितीज चव्हाण;

 

२) हेरंब क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ६ गडी बाद १४४ धावा (सुमित साळुंके ८७ (९८, ८ चौकार), अ‍ॅरॉन बिनु ३५, भाग्येश नवरट ४-१८);(भागिदारी- सुमित आणि अ‍ॅरॉन यांच्यात तिसर्‍या गड्यासाठी १२१ (१२९) वि.वि. निंबाळकर रॉयल्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २८.५ षटकात १० गडी बाद ८४ धावा (आयुश उभे २२, भाग्येश नवरट २१, सुमित साळुंके २-११, आदेश राऊत २-५); सामनावीरः सुमित साळुंके;

 

Web Title : Punit Balan Group | The first ‘Punit Balan Trophy’ to win the under-14 cricket tournament; Heramba Cricket Academy, Brilliant Sports Academy teams win for the second time in a row!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Forest Department Maharashtra | साताऱ्यापासून सिंधुदुर्गापर्यंत व्याघ्रक्षेत्र घोषित होणार

Constitution Day | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ ऐतिहासिक वारसा मुरबाड भूमीत भारतीय संविधानाचा 72 वा वर्धापन दिन साजरा

Balika Vadhu-2 | नऊ वर्षांनी पुढे गेली बालिका वधूची कहाणी; शिवांगी जोशी, समृद्ध आणि रणदीपची धमाकेदार एन्ट्री