Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघ, माणिकचंद ऑक्सिरीच संघांची विजयाची हॅट्रीक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघ आणि माणिकचंद ऑक्सिरीच संघ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत विजयाची हॅट्रीक नोंदविली. (Punit Balan Group)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत सिध्दार्थ म्हात्रे याच्या ८६ धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने रायझिंग डे इलेव्हन संघाचा ७४ धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने २५५ धावांचा डोंगर उभा केला. सिध्दार्थ म्हात्रे याने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. याबरोबरच अर्थव काळे (५९ धावा), ऋतुराज वीरकर (३७ धावा) आणि सागर सावंत (नाबाद २२ धावा) यांनी आपल्या फलंदाजीने तडाखा दिला. या आव्हानासमोर रायझिंग डे इलेव्हनचा डाव १८१ धावांवर मर्यादित राहीला. ओम साळुंखे याने १०४ धावांची खेळी केली. पण संघाचा पराभव टाळू शकली नाही. (Punit Balan Group)

अविनाश शिंदे याच्या ८३ धावांच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने गाडगे अँड कंपनी संघाचा ५४ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला. माणिकचंद ऑक्सिरीच संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९ षटकात १६९ धावा धावफलकावर लावल्या. अविनाश शिंदे (नाबाद ८३) आणि पलाश कोंढारे (नाबाद ४८ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानासमोर गाडगे अँड कंपनीचा डाव ११५ धावांवर मर्यादित राहीला. गोलंदाजीमध्ये ऑक्सिरीच संघाकडून अविनाश शिंदे (३-२१), अक्षय जाधव (३-२१) आणि निखील भोगले (२-१९) यांनी अचूक गोलंदाजी केली.

 

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
१) पुनित बालन ग्रुपः १९ षटकात ४ गडी बाद २५५ धावा (सिध्दार्थ म्हात्रे ८६ (३८, ११ चौकार, ३ षटकार), अर्थव काळे ५९ (२४, ८ चौकार, २ षटकार), ऋतुराज वीरकर ३७, सागर सावंत नाबाद २२) वि.वि. रायझिंग डे इलेव्हनः १९ षटकात ६ गडी बाद १८१ धावा (ओम साळुंखे १०४ (५५, १४ चौकार, ४ षटकार), दिवाकर पांडे २६, श्रीकांत मुंडे ३-१९); सामनावीरः सिध्दार्थ म्हात्रे;

२) माणिकचंद ऑक्सिरीचः १९ षटकात ३ गडी बाद १६९ धावा (अविनाश शिंदे नाबाद ८३ (४७, ५ चौकार, ६ षटकार, पलाश कोंढारे नाबाद ४८, सचिनकुमार शाहू २-२७) वि.वि. गाडगे अँड कंपनीः १८.१ षटकात १० गडी बाद ११५ धावा (अभिजीत रोहनदीया ४६, झुबेर काझी २६, अविनाश शिंदे ३-२१, अक्षय जाधव ३-२१, निखील भोगले २-१९); सामनावीरः अविनाश शिंदे;

Web Title :- Punit Balan Group | The third ‘s. Balan T-20 League Championship Cricket Tournament! Victory hat trick of Puneet Balan Group team, Manikchand Oxirich team


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले – ‘डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते, लवकरच…’

Nails Health | ‘या’ 4 कारणामुळे खराब आणि कमजोर होतात नखे, आजारांचा देतात संकेत; जाणून घ्या

Munmun Dutta Hot Pics | तारक मेहता मालिकेमधील बबीतानं ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिला हटके लूक, पाहा व्हायरल फोटो