Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; अर्थव काळेची नाबाद शतकी खेळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयाचा चौकार मारला. विझार्डस् इलेव्हन संघाने स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला. (Punit Balan Group)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अर्थव काळे याच्या नाबाद शतकी खेळीमुळे पुनित बालन ग्रुप संघाने जिनवानी इलेव्हन संघाचा ९८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुप संघाने २० षटकामध्ये ६ गडी गमावून २४८ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये अर्थव काळे याने नाबाद १०० धावा तर, ऋतुराज वीरकर याने ९० धावांची खेळी केली. या दोघांनी ६४ चेंडूत १५१ धावांची भागिदारी रचली व संघाला धावांचा डोंगर उभा करून दिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना जिनवानी इलेव्हनचा डाव २० षटकात १५० धावांवर मर्यादित राहीला. (Punit Balan Group)

नवीन कटारीया याच्या चमकदार गोलंदाजीच्या जोरावर विझार्डस् इलेव्हन संघाने गाडगे अँड कंपनी इलेव्हन संघाचा ३ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गाडगे अँड कंपनी इलेव्हन संघाने २० षटकात १४५ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये विझार्डस् संघाच्या नवीन कटारीया याने ३० धावात ३ गडी टिपले व प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला मर्यादा घातल्या. हे आव्हान विझार्डस् इलेव्हन संघाने १९.५ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. रत्नदीप लोंढे (३४ धावा) आणि आदित्य गजभिये (२८ धावा) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

 

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः

१) गाडगे अँड कंपनी इलेव्हनः २० षटकात १० गडी बाद १४५ धावा (विशाल रंगलानी २७, अजित राय २१, स्वप्निल चिकणे २०, नवीन कटारीया ३-३०) पराभूत वि. विझार्डस् इलेव्हनः
१९.५ षटकात ७ गडी बाद १४६ धावा (रत्नदीप लोंढे ३४,
आदित्य गजभिये २८, शुभम कदम १७, मुस्ताक शेख ३-१५); सामनावीरः नवीन कटारीया;

२) पुनित बालन ग्रुपः २० षटकात ६ गडी बाद २४८ धावा (अर्थव काळे नाबाद १०० (४६, ११ चौकार, ४ षटकार), ऋतुराज वीरकर ९० (४९, ८ चौकार, ६ षटकार), नितेश पटेल २-२९);
(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी अर्थव आणि ऋतुराज यांच्यात १५१ (६४ चेंडू) वि.वि. जिनवानी इलेव्हनः
२० षटकात ७ गडी बाद १५० धावा (हिमांशु अगरवाल ३८,
निखील वाघेला ३३, पवन आनंद नाबाद ३०, उमश शहा २-१४); सामनावीरः अर्थव काळे;

Web Title :- Punit Balan Group | The third ‘s. Balan T-20 League Cricket Championship! Puneet Balan Group’s winning four; Arthav Kale’s unbeaten century


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level Control | डायबिटीजच्या रूग्णांनी दररोज चावून खावीत ‘या’ गुलाबी फुलाची पाने, ब्लड शुगर लेव्हल होईल कंट्रोल

Pune Crime | कोंढवा खुर्द परिसरात तरुणाला कोयत्याने मारहाण ! 12 जणांवर FIR, तिघांना अटक

Pune Crime | मंगळवार पेठेत तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून मारहाण, सराईत गुन्हेगारसह 7 जणांवर FIR