Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, गेमचेंजर्स इलेव्हन संघांचा विजयी चौकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि गेमचेंजर्स इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत विजयांचा चौकार मारला. (Punit Balan Group)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत रोहीत करंजकर याच्या खेळीमुळे केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीच संघाने ओंकार खाटपे याच्या ८३ धावांच्या जोरावर १८ षटकात ७ गडी गमावून १३७ धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने १५.३ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. यामध्ये विशाल भिलारे याने नाबाद ५० धावांची खेळी केली. रोहीत करंजकर (नाबाद ४१ धावा) आणि मंदार भंडारी (३१ धावा) यांनीही छोट्या खेळी करत संघाचा विजय सोपा केला. (Punit Balan Group)

तुशार श्रीवास्तव याच्या अर्धशतकी खेळीमुळे गेमचेंजर्स इलेव्हन संघाने जिनवानी इलेव्हन संघाचा ४ गडी राखून पराभव करत सलग चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना जिनवानी इलेव्हन संघाने नितीश सप्रे (नाबाद ६३ धावा), हिमांशु अगरवाल (२३ धावा) आणि सौरभ जळगांवकर (नाबाद ३६ धावा) यांच्या खेळीमुळे २० षटकात १ गडी गमावून १४० धावा धावफलकावर लावल्या. गेमचेंजर्स इलेव्हन संघाने हे आव्हान १६.२ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. तुशार श्रीवास्तव (५५ धावा), रोहन दामले (२९ धावा) आणि नौशाद शेख (२८ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाचा विजय सोपा झाला.

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
१) माणिकचंद ऑक्सिरीचः १८ षटकात ७ गडी बाद १३७ धावा (ओंकार खाटपे ८३ (६३, ७ चौकार, ५ षटकार), अविनाश शिंदे १७, अक्षय चव्हाण २-२५, अमीश शेख २-१७) पराभूत वि. केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १५.३ षटकात २ गडी बाद १४१ धावा (विशाल भिलारे नाबाद ५० (४४, ६ चौकार), रोहीत करंजकर नाबाद ४१, मंदार भंडारी ३१, निखील भोगले १-२४); सामनावीरः रोहीत करंजकर;

२) जिनवानी इलेव्हनः २० षटकात १ गडी बाद १४० धावा (नितीश सप्रे नाबाद ६३ (६४, ९ चौकार), हिमांशु अगरवाल २३, सौरभ जळगांवकर नाबाद ३६) पराभूत वि. गेमचेंजर्स इलेव्हनः १६.२ षटकात ६ गडी बाद १४४ धावा (तुशार श्रीवास्तव ५५ (३९, ९ चौकार), रोहन दामले २९, नौशाद शेख २८, कनिष्क सिंग ४-१९); सामनावीरः तुशार श्रीवास्तव;

Web Title :- Punit Balan Group | The third ‘s. Balan T20 League Cricket Championship! Kedar Jadhav Cricket Academy, Game Changers XI teams winning fours


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon Crime | मारहाणीत कैद्याचा मृत्यू ! तुरुंग अधीक्षकांसह 4 रक्षकांवर खुनाचा FIR दाखल

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी अचूक औषध आहे ‘हे’ मिल्क प्रॉडक्ट, डेली डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

Pune Crime | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास धानोरीत मारहाण ! 20 ते 25 जणांवर FIR; दोघांना अटक