Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! विझार्डस् इलेव्हन, एसके डॉमिनेटर्स संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत विझार्डस् इलेव्हन आणि एसके डॉमिनेटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला. (Punit Balan Group)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत प्रविण सिंग याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विझार्डस् इलेव्हन संघाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस् संघाचा २०७ धावांनी धुव्वा उडविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना विझार्डस् इलेव्हन संघाने २० षटकामध्ये ७ गडी गमावून २५६ धावांचा डोंगर उभा केला. नवीन कटारीया (६७ धावा), आदित्य गजभिये (४६ धावा) आणि रत्नदिप लोंढे (४१ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर संघाने अडीचशे धावसंख्येचा डोंगर रचला. या आव्हानाला उत्तर देताना क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस् संघाचा डाव ४९ धावांवर गुंडाळला गेला. विझार्डस् संघाच्या प्रविण सिंग याने ८ धावात ४ गडी टिपले. (Punit Balan Group)

दुसर्‍या सामन्यात शुभम खटाळे याच्या ६१ धावांच्या जोरावर एसके डॉमिनेटर्स संघाने राझिंग डे इलेव्हन संघाचा ३५ धावांनी पराभव केला. शुभम खटाळेच्या ६१ धावांमुळे एसके डॉमिनेटर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५३ धावांचे आव्हान उभे केले. याला उत्तर देताना रायझिंग डे इलेव्हनचा डाव ११८ धावांवर मर्यादित राहीला.

स्पर्धेचे उद्घाटन पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीच ग्रुपच्या संचालिका जान्हवी धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

 

स्पर्धेचे सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
१) विझार्डस् इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद २५६ धावा (आदित्य गजभिये ४६, रत्नदिप लोंढे ४१, नवीन कटारीया ६७ (२६, ५ चौकार, ६ षटकार), आमिर अनिस ३-३१, विजय सहानी २-४८) वि.वि. क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस्ः १८ षटकात १० गडी बाद ४९ धावा (शौर्य राज १९, प्रविण सिंग ४-८, संतोष कुमार सांगळे ३-१); सामनावीरः प्रविण सिंग;

२) एसके डॉमिनेटर्सः १८.४ षटकात १० गडी बाद १५३ धावा (शुभम खटाळे ६१ (३८, ४ चौकार, ५ षटकार), गणेश महापुरे २१, शिवम ठोंबरे ३०, सागर कांबळे ४-३१) वि.वि. रायझिंग डे इलेव्हनः १७.५ षटकात १० गडी ११८ धावा (नीरज सेन नाबाद ५९ (३८, ३ चौकार, ५ षटकार), सागर कांबळे ३०, महेश वाघिरे ४-१४, कुणाल सुर्वे २-१२); सामनावीरः शुभम खटाळे

Web Title :- Punit Balan Group | The third ‘S. Balan Trophy ! T-20 Cricket Tournament! Wizards XI, SK Dominators celebrated the opening day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Price Today | खुशखबर ! आठवडाभरात सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या दर

Lemon Juice Benefits | लिंबूचा रस डोक्याच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे का?, वाचा सविस्तर

|
Sanjay Raut ON AIMIM Offer | एमआयएमने राष्ट्रवादीला दिलेल्या युतीच्या ऑफरवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया