Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group Women’s Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये गौतमी नाईक हिच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर न्युट्रीलियस संघाने स्मार्ट लायन्स् संघाचा ७१ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (Punit Balan Group Women’s Premier League)

 

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युट्रीलियस संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १६१ धावांचे आव्हान उभे केले. गौतमी नाईक हिने ५६ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ९४ धावांची खेळी केली. या शिवाय ऋतुजा गिलबिले हिने २३ धावांचे योगदान दिले. या आव्हानाला उत्तर देताना स्मार्ट लायन्स् संघाची सुरूवात चांगली झाली नाही. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले व आव्हान अवाक्याबाहेर गेले. संघाला १८.४ षटकात ९० धावाच करता आल्या. स्मार्ट संघाकडून करीश्मा शिंदे (१६ धावा) आणि चिन्मयी बोरफळे (१४ धावा) यांनी प्रतिकार केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण चंचलाताई कोद्रे क्रिडा संकुलाचे संचालक संदीपदादा कोद्रे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या स्मिताताई लडकत, पुनित बालन ग्रुपचे संतोष शहा, राजेंद्र आगाशे, अशोक खराडे आणि न्युट्रीलियस धीरज जैन यांच्या हस्ते करण्यात आले. अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे विनायक सुर्यवंशी, हृषीकेश आगाशे, प्रफुल्ल मानकर, अमित गणपुले, रोहीत खराडे आणि अभिराज वाधवने यावेळी उपस्थित होते.

 

स्पर्धेतील विजेत्या न्युट्रीलियस संघ आणि उपविजेत्या स्मार्ट लायन्स् संघाला करंडक व खेळाडूंना मेडल्स् देण्यात आली.
मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू व सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा मान सायली लोणकर (न्युट्रीलियस, ११४ धावा आणि ८ विकेट) हिला देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट बॅटर- गौतमी नाईक (न्युट्रीलियस, १७८ धावा), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक वैष्णवी शिंदे (स्मार्ट लायन्स्) अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.

 

अंतिम फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकालः

 

न्युट्रीलियस संघः २० षटकात ६ गडी बाद १६१ धावा (गौतमी नाईक नाबाद ९४ (५६, १३ चौकार, ३ षटकार), ऋतुजा गिलबिले २३, किरण नवगिरे १-२३) वि.वि. स्मार्ट लायन्स्ः १८.४ षटकात १० गडी बाद ९० धावा (करीश्मा शिंदे १६, चिन्मयी बोरफळे १४, स्वांजली मुळे २-१४, सौम्या २-४); सामनावीरः गौतमी नाईक;

Web Title :-  Punit Balan Group Women’s Premier League | 7th Puneet Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament; The Neutralias team won

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Police | ठाकरे सरकारचा निर्णय ! मुंबईत पोलिसांना मिळणार 50 लाखांमध्ये घर

Eye Care | ‘या’ तीन गोष्टींमुळे डोळ्यांच होतं गंभीर नुकसान; जाणून घ्या

Chandrakant Patil on Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा’ – चंद्रकांत पाटील