Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघाची विजयाची हॅट्रीक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group Women’s Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन गु्रप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा सलग तिसरा पराभव करत विजयाची हॅट्रीक नोंदवली. (Punit Balan Group Women’s Premier League)

 

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत भक्ति मिरजकर हिच्या अष्टपैलू खेळीमुळे वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघाने ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाने २० षटकात १२१ धावांचे आव्हान उभे केले. तेजल हसबनीस हिने ४९ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. वॉरीयर्स संघाच्या भक्ती मिरजकर (२-१२) व आदीती वाघमारे (२-२२) यांनी अचूक गोलंदाजी केली. वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबने हे आव्हान १९.१ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. सुशमा पाटील हिने ५० धावा, भक्ती मिरजकर हिने नाबाद २९ धावा आणि आदिती वाघमारे हिने १५ धावा करून संघाला सहज विजय मिळवला. (Punit Balan Group Women’s Premier League)

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Warriors Sports Club team's winning hat trick
File Photo

 

सुशमा पाटील हिच्या कामगिरीच्या जोरावर वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबने लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा १८ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला. वॉरीयर्स संघाने पहिल्यांदा खेळताना २० षटकात ११८ धावा जमविल्या. यामध्ये सुशमा पाटील हिने ४२ धावांची तर, आदिती वाघमारे हिने ३० धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा डाव २० षटकात १०० धावांवर मर्यादित राहीला. वॉरीयर्सच्या उत्कर्षा कदम (२-१४), साई चव्हाण (२-१६) आणि कृतिका चौधरी (२-१९) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय साकार केला.

 

गटसाखळी फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकालः

 

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Warriors Sports Club team's winning hat trick
File Photo

 

ऑक्सिरीच स्मॅशर्सः २० षटकात ७ गडी बाद १२१ धावा (तेजल हसबनीस ४९ (४२, ७ चौकार), प्रियांका कुंभार १०, भक्ती मिरजकर २-१२, आदीती वाघमारे २-२२) पराभूत वि. वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबः १९.१ षटकात ४ गडी बाद १२४ धावा (सुशमा पाटील ५० (४५, ६ चौकार), भक्ती मिरजकर नाबाद २९, आदिती वाघमारे १५, मनाली कुलकर्णी १-१४); सामनावीरः भक्ती मिरजकर;

वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबः २० षटकात ५ गडी बाद ११८ धावा (सुशमा पाटील ४२, आदिती वाघमारे ३०, उत्कर्षा पवार २-२२) वि.वि. लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः २० षटकात ९ गडी बाद १०० धावा (चार्मी गवई २४, उत्कर्षा पवार १६, उत्कर्षा कदम २-१४, साई चव्हाण २-१६, कृतिका चौधरी २-१९); सामनावीरः सुशमा पाटील.

Web Title :- Punit Balan Group Women’s Premier League | 7th Puneet Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament; Warriors Sports Club team’s winning hat trick

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sohail Khan Divorce | खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट, आता सोहेल मोडतोय 24 वर्षांचा संसार

Load Shedding in Maharashtra | ‘महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही’ – ऊर्जामंत्री नितीन राऊत

Diabetes Control Tips | ब्लड शुगर कंट्रोल करायचे असेल तर दिवसभरात करा ‘ही’ 5 कामे; जाणून घ्या