Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; स्मार्ट लायन्स्, ऑक्सिरीच स्मॅशर्स संघांची विजयी कामगिरी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Punit Balan Group Women’s Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन गु्रप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत स्मार्ट लायन्स् आणि ऑक्सिरीच स्मॅशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत विजयी कामगिरी केली. (Punit Balan Group Women’s Premier League)

 

 

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मृणाल बोडके हिच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्मार्ट लायन्स् संघाने न्युट्रीलिशियस् संघाचा २५ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मार्ट लायन्स् संघाला ९४ धावा जमविता आल्या. इश्‍वरी असावरे हिने ३१ धावांचे तर, वैष्णवी के. हिने १७ धावांचे योगदान दिले. या आव्हानाला उत्तर देताना न्युट्रीलिशियस् संघाला २० षटकामध्ये ६९ धावाच करता आल्या. स्मार्ट संघाच्या मृणाल बोडके (३-१०), किरण नवगिरे (२-६) आणि रोहीणी माने (२-१४) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय साकार केला. (Punit Balan Group Women’s Premier League)

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Winning performance of Smart Lions, Oxyrich Smashers team!
File Photo

 

तेजल हसबनीस हिच्या १०६ धावांच्या खेळीमुळे ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाने हेमंत पाटील ग्रुप संघाचा १५ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑक्सिरीच स्मॅशर्सने २० षटकात १८५ धावांचे आव्हान उभे केले. तेजल हसबनीस हिने ६५ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह १०६ धावांची खेळी केली. तिला मनाली जाधव हिने ४२ धावा करून योग्य साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना हेमंत पाटील ग्रुपचा डाव २० षटकामध्ये १७० धावांवर मर्यादित राहीला. कर्णधार पुनम खेमनार हिने ५३ धावांची, श्रेया सुभाष (४३ धावा) आणि पुर्वा बिडकर (३४ धावा) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही.

 

गटसाखळी फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकालः

 

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Winning performance of Smart Lions, Oxyrich Smashers team!
File Photo

 

स्मार्ट लायन्स्ः २० षटकात ९ गडी बाद ९४ धावा (इश्‍वरी असावरे ३१, वैष्णवी के. १७, चिन्मयी बोरफळे १५, सायली लोणकर २-१५, सोनल पाटील २-९) वि.वि. न्युट्रीलिशियस् संघः २० षटकात ९ गडी बाद ६९ धावा (सायली लोणकर १२, जाई शिंदे १४, मृणाल बोडके ३-१०, किरण नवगिरे २-६, रोहीणी माने २-१४); सामनावीरः मृणाल बोडके;

ऑक्सिरीच स्मॅशर्सः २० षटकात ४ गडी बाद १८५ धावा (तेजल हसबनीस १०६ (६५, १२ चौकार, ३ षटकार), मनाली जाधव ४२ (३३, ५ चौकार), पुनम खेमनार २-३९) वि.वि. हेमंत पाटील ग्रुपः २० षटकात ५ गडी बाद १७० धावा (पुनम खेमनार ५३ (२६, ७ चौकार, ३ षटकार), श्रेया सुभाष ४३, पुर्वा बिडकर ३४, तेजश्री ननावरे २-३९); सामनावीरः तेजल हसबनीस.

Web Title : –  Punit Balan Group Women’s Premier League | 7th Puneet Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament; Winning performance of Smart Lions, Oxyrich Smashers team!


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP president Sharad Pawar | केतकी चितळेने केलेल्या असभ्य टिकेवर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले…

Drinking Cold Water Is Good Or Bad | थंड पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते का? जाणून घ्या

DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा होणार वाढ, जाणून घ्या केव्हा आणि किती रुपये वाढणार?