Punit Balan Studios | कोळीवाड्यातला जग्गू आणि अमेरिकन जुलिएटची भन्नाट लव्हस्टोरी ! ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती

पुणे : पुनित बालन स्टुडिओज् (Punit Balan Studios) निर्मित‘जग्गू आणि जुलिएट’ चित्रपटाचं (Jaggu Ani Juliet Marathi Movie) मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. कोळीवाड्यातला जग्गू आणि अमेरिकेची जुलिएट एकत्र धमाल करत आहेत हे आपण मोशन पोस्टरमध्ये बघितलंच! मात्र या दोघांसोबत आणखी कोण कोण ‘जग्गू आणि जुलिएट’मध्ये धमाल करायला असेल याचं कोडं आता उलगडलं आहे. मोशन पोस्टरनंतर रिलीज झालेल्या टीझरमध्ये तगडी स्टारकास्ट दिसत आहे आणि या टीझरलाही तूफान प्रेम मिळतंय. (Punit Balan Studios)

 

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ Jaggu Ani Juliet (2023) या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत आहेत, हे आपल्याला मोशन पोस्टरमधून समजलंच होतं. मात्र टीझरवरून असं दिसतंय की, या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज धमाल करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. कोळीवाड्याचा लाडका जगदीश उर्फ जग्गू आणि अमेरिकेतल्या चितळ्यांची इंग्रजाळलेली जुलिएट यांच्या भन्नाट प्रेमकथेची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. दोन भिन्न स्वभावाच्या आणि समाजाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेले जग्गू आणि जुलिएट एकमेकांच्या कसे प्रेमात पडतात, त्यांच्या प्रेमात रंग भरण्यासाठी इतर पात्रं काय काय करामती करतात आणि या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी गंगा नदी आणि देवभूमी उत्तराखंडातील नयनरम्य दृश्य या सगळ्यामुळे चित्रपटाचा टीझर भन्नाट झाला आहे. (Punit Balan Studios)

अभिनेता अमेय वाघची नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळ्या ढंगाची भूमिका या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. त्याच्या अतरंगी संवादामुळे त्याची भूमिका बहारदार दिसत आहे. तसेच वैदेही परशुरामीने पुन्हा एकदा कलरफुल दिसत, आपल्या हास्याने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा घायाळ केली आहेत. तर अजय-अतुल या जोडीची वेगवेगळ्या जॉनरची गाणी आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतील. अमेय-वैदेहीसोबतच हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौगुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे, त्यामुळे मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.

 

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या (Mulshi Pattern)
सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित होत आहे.
पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि
कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.

 

Web Title :- Punit Balan Studios | Amazing love story of Jaggu and American Juliet in
Koliwada! A new production of ‘Puneet Balan Studios’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा