Pathankot | पठाणकोट : सैन्याच्या छावणीजवळ ग्रेनेड हल्ला; पंजाबसह सर्वत्र हायअलर्ट जारी

पठाणकोट : पठाणकोट (Pathankot) येथील भारतीय सैन्यांच्या कॅम्पजवळ असलेल्या त्रिवेणी गेटवर ग्रेनड हल्ला करण्यात आला. अज्ञात आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांनीच हा ग्रेनेड हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रेनेड हल्ल्यानंतर संपूर्ण पंजाबात अलर्ट जारी करण्यात आला आहे. Pathankot हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पठाणकोट एअरफोर्स स्टेशन व सैन्य दलाच्या इतर छावण्या असलेल्या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

 

 

पठाणकोटमध्ये (Pathankot) धारा पुलाजवळ सैन्यदलाच्या एका छावणीजवळ असलेल्या त्रिवेणी गेटवर सोमवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ग्रेनेड हल्ला केला. पोलिसांना घटनास्थळी ग्रेनेडचे काही तुकडे सापडले आहेत. पोलीस संबंधित परिसरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेनंतर लगेच पंजाबच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

 

याबाबत पठाणकोटचे (Pathankot) एस एस पी सुरेंद्र लांबा यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा इथे पोहोचलो, तेव्हा प्राथमिक दृष्ट्या इथे ग्रेनेड हल्ला झाल्याचे निदर्शनास आले. घटनेच्यावेळी या भागातून एक दुचाकी गेली. आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे देखील तपास करीत आहोत.

 

सहा वर्षापूर्वी पठाणकोट एअर फोर्स स्टेशनवर अतिरेकी हल्ला झाला होता. त्यानंतर या परिसरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रथमच असा प्रकार घडला आहे.

 

Web Title :- Punjab | A grenade blast took place near Triveni Gate of an Army camp in Pathankot.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा