महिलेच्या विवाहबाह्य संबंधामुळं मुलांचा ताबा नाकारू शकत नाही – उच्च न्यायालय

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाइन – चंदीगड हायकोर्टाने (High Court) एका कौटुंबिक वादाप्रकरणी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. यात कोर्टानं म्हटलं आहे की, “महिलेचे विवाहबाह्य संबंध आहेत, या आधारावर तिला वाईट आई ठरवता येणार नाही. तसेच मुलाचा ताबा तिला नाकारता येणार नाही.”

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

न्यायमूर्ती अनुपींदर सिंग ग्रेवाल म्हणाले, की “महिलेचे विवाहबाह्य संबंध असले तरी ती एक वाईट आई आहे असं होऊ शकत नाही.
त्यामुळे तिला मुलाचा ताबा नाकरला जाऊ शकत नाही. तसेच पितृसत्ताक समाजामध्ये महिलेच्या चरित्रावर प्रश्न उपस्थित करुन तिला वाईट ठरवलं जातं.
अनेकदा महिलेवरील अशा आरोपांचा काहीही आधार नसतो.”

पंजाबमधील फतेगड साहेबच्या एका महिलेने हबिस कॉर्पस याचिका कोर्टा ( High Court ) त दाखल केली होती. ही महिला सध्या ऑस्ट्रेलियाची नागरिक आहे.
महिलेने याचिकेमध्ये सांगितलं की, तिने २०१३ मध्ये लग्न केले होते.
तिचा पती मुळचा लुधियानाचा आहे, पण सध्या ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे.
महिलाही नंतर ऑस्ट्रेलियात गेली होती आणि दोघांना २०१७ साली एक मुलगी झाली.
पुढील काळात त्यांच्यात वाद निर्माण झाला २०२० मध्ये ते जेव्हा भारतात आले, त्यावेळी ते वेगळे झाले.
पण, पतीने मुलीला आपल्याजवळ ठेवले. त्यानंतर महिला आपल्या सासरी राहायला गेली.

50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पतीने दावा केला होता की, “मुलगी त्याच्यासोबत राहत असून तिची काळजी घेण्यासाठी तिचे आजी-आजोबा आहेत. गेल्या एक वर्षापासून मुलगी माझ्यासोबत राहत आहे. त्यामुळे एकट्या राहणाऱ्या तिच्या आईकडे मुलीचा ताबा देऊ नये.” दरम्यान, कोर्टाने ( High Court ) पतीची मागणी फेटाळली आणि हायकोर्टा(High Court) ने साडेचार वर्षाच्या मुलाचा ताबा महिलेला सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी; पुढं झालं असं काही…