Punjab Assembly Election 2022 | पंजाब मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर; आम आदमी पार्टीकडून ‘या’ नावाची घोषणा

पंजाब ; वृत्तसंस्था – Punjab Assembly Election 2022 | आगामी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर पाच राज्यात राजकीय घडामोडींना वेग लागला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. तसेच मुख्यमंत्री पदाचा उमेदवारही जाहीर केला जातोय. दरम्यान पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा (Aam Aadmi Party) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नेमका कोण असणार ? याची उत्सुकता सगळ्यांना होती. आता आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केली. आपकडून भगवतं सिंह मान (Bhagwant Singh Mann) हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं निश्चित करण्यात आलं आहे.

 

”पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार स्थापन होणार आहे.
पंजाबचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी 21 लाख 59 हजार लोकांनी आपला कौल दिला, त्यापैकी 93.3 टक्के लोकांनी भगवंत सिंह मान यांच्या नावावर सहमती दर्शवली.
तर, भगवंत सिंह मान हे माझ्या धाकट्या भावासारखे आहेत.
पण मी आधी त्यांचे नाव जाहीर केले असते तर लोकांनी त्यांच्यावर आरोप केले असते.
कारण बहुतेक लोक घराणेशाही करतात.
पण, आमच्या पक्षाने मुख्यमंत्री चेहरा निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीचा अवलंब केला.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी जनतेचा कौल घेतला आहे.” असं अरंविद केजरीवाल म्हणाले. (Punjab Assembly Election 2022)

दरम्यान, पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाहीत.
तरीही काही लोकांनी सल्लामसलत करताना अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतले.
खरंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा शीख समुदायाचा असेल, असे आम आदमी पक्षाने आधीच स्पष्ट केले होते.
2017 साली मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसल्यामुळे ‘आप’ला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळालं.
बाहेरच्या राज्यातून कोणी येऊन मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो? असं विरोधकांनी म्हटले होते.
अखेर आप पक्षाच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.

 

Web Title :- Punjab Assembly Election 2022 | arvind kejriwal announces cms face for punjab bhagwant singh mann becomes first choice of people

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा