Punjab Assembly Election | अभिनेता सोनू सूदची बहीण पंजाब विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

चंढीगड : वृत्तसंस्था – Punjab Assembly Election | पुढील वर्षी (2022) मध्ये पाच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभुमीवर त्या-त्या राज्यातील पक्षाने आपली कंबर कसली आहे. पाचपैकी पंजाब राज्यातही निवडणुक होणार आहे. तर, भारतीय चित्रपट अभिनेता सोनु सुद (Actor Sonu Sood) याची बहिण पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly Election) लढवणार असल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाच्या महामारीत अभिनेता सोनु सुद (Actor Sonu Sood) गरीबांच्या मदतीसाठी पुढे सरसावला होता. त्या काळात अनेक गरीब नागरीकांसाठी सोनु सुदने दोन हात केले होते. दरम्यान, आता राजकीय पक्षांकडून सोनु सदला पंजाब निवडणूक लढवण्याची ऑफर मिळाली होती. पंरतु सोनु सुदने ही ऑफर नाकारली असल्याचं समजते.

दरम्यान, अभिनेता सोनु सुदची बहिण मालविका सुद सुच्चर (Malvika Sood Suchar) पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झाल्याचे कळते.
दरम्यान, मालविका कोठुन निवडणूक लढवणार? आणि मुख्य म्हणजे कोणत्या पक्षातून निवडणुकीस उभं राहणार? याबाबत माहिती अद्याप समोर आली नाही.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Amazon | अ‍ॅमेझॉनवर कढीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; जाणून घ्या प्रकरण

Sukanya Samriddhi Yojana | सरकारच्या ‘या’ स्कीम अंतर्गत तुमच्या मुलीला मिळतील पूर्ण 15 लाख रुपये, विवाह किंवा शिक्षण कुठेही करू शकता वापर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Punjab Assembly Election | sonu soods sister contest punjab assembly polls

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update