आजपासून पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये दारुची ‘होम डिलिव्हरी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे मागील दीड महिन्यांपासून बंद असलेली दारुची दुकाने सर्शत सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पंजाब सरकारने आजपासून राज्यामध्ये दारू विक्री सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे घरपोच दारू पोहोचवण्याचीही व्यवस्था केली आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत दारुची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंजाबमध्ये कर्फ्यू असला तरी दररोज चार तासांसाठी संचारबंदी शिथील करण्यात येते. या वेळेत दारू विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

ग्राहकाला दोन लिटरपेक्षा जास्त दारुची विक्री करु नये असे सरकारी आदेशात म्हटले आहे. दारू विक्रेत्यांना घरपोच दारू पोहोचवण्याची परवानगी दिली असली तरी त्यामध्ये काही अटी आहेत. दारुची डिलिव्हरी करणार्‍या मुलांकडे कर्फ्यू पास, ओळखपत्रा आणि डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी जे वाहन वापरणार त्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी आवश्यक असणार आहे. पंजाबप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही दारुच्या होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आली आहे.

त्यासाठी सरकारने वेबसाइट लाँच केली असून त्यावर 21 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती दारुची ऑनलाइन ऑर्डर देऊ शकते. दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर अनेक राज्यांमध्ये वाईन शॉपबाहेर मोठया रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे मोठया प्रमाणावर उल्लंघन झाले. मद्य विक्री सुरु केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसले. त्यामुळे कोरोनाचा अधिक फैलाव होऊ शकतो अशी टीकाही मोठया प्रमाणात झाली. मुंबईतही दारुच्या दुकानांबाहेर गर्दी झाल्याने दारू विक्रीचा निर्णय रद्द करण्यात आला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like